ACCIDENT | बायथाखोल बोरीत अपघातांचं सत्र सुरूच; प्रवासी बस‌ कलंडली

मंगळवारी सकाळची घटना; अपघातात 5 प्रवासी जखमी; जखमींवर फोंडा उपजिल्हा हॉस्पिटलात उपचार सुरू

Goan Varta Live | प्रतिनिधी

फोंडाः राज्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. राज्यातील बेकार झालेले रस्ते, भटकी गुरं इ. कारणांमुळे अपघातांची प्रकरणं वाढली असल्याचं बोललं जातंय. बायथाखोल बोरी येथील रस्ता तर अपघातांसाठी प्रसिद्ध होत चाललाय. या रस्त्याची झालेली दुर्दशा, त्यामुळे या मार्गावर अनेकवेळा भयंकर स्वरुपाचे अपघात झालेले ऐकू येतात. मंगळवारी या ठिकाणी भयंकर अपघात झाल्याचं समजतंय.

कुणाचा अपघात?

मंगळवारी सकाळची घटना. फोंडा तालुक्यातील बायताखोल-बोरी येथे मुंबई – गोवा मार्गावर एक मोठी प्रवासी बस‌ कलंडली असल्याचं समजतंय. मुंबईहून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या या बसला मोठा अपघात झालाय. ही बस एका बाजूने पूर्ण कलंडली आहे. बसला अपघात झाला तेव्हा बसमध्ये प्रवासी होते. सुदैवाने थोडक्यावरच निभावलंय.

5 प्रवासी जखमी

थोडक्यात जरी निभावलं असलं तरी अपघात तसा मोठा होता. पूर्ण बसच कलंडल्याने बसमधील प्रवासी या अपघातात जखमी झाल्याचं समजतंय. एकूण 5 प्रवासी जखमी झाले असल्याचं वृत्त हाती येतंय. सदर जखमींवर फोंडा उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

अग्निशमन दलाची कामगिरी

प्रवासी बस कलंडताच तेथील उपस्थितांनी तातडीने अग्निशमन दलाशी संपर्क साधला. अपघाताची बातमी समजताच अग्निशमन दल तातडीने अपघाताच्या ठिकाणी दाखल झालं. प्रसंगवधान दाखवत अग्निशमन दलाच्या जवानांनी बसमध्ये अडकलेल्या श्रीधर भावे (वय वर्षं, 43) या प्रवाशाला बाहेर काढलं.

अपघात नक्की कसा झाला, हे अद्याप समजू शकलेलं नाही. पोलिस तपास सुरू असल्याची माहिती मिळतेय.

हा व्हिडिओ पहाः Crime | Follow Up | Major Development | सिद्धी नाईकच्या मृत्यूप्रकरणी महत्त्वाची अपडेट

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!