ACCIDENT | रविवारी कवळे येथे अपघात

दोन युवक गंभीर जखमी; गायीचा मृत्यू

शेखर नाईक | प्रतिनिधी

फोंडाः राज्यात अपघातांचं सत्र सुरूच आहे. रोज अनेक अपघातांच्या बातम्या समोर येत आहेत. दुचाकी-चारचाकी वाहनांसोबतच ट्रक, बसेस यांच्या अपघातांचं प्रमाणही बऱ्यापैकी वाढलेलं दिसतंय. या वाढत्या अपघातांसाठी पाऊस तसंच राज्यातील रस्त्यांची वाईट अवस्था, वेगाने वाहनं हाकणे, स्पर्धा करण्याचं वेड इ. अशी अनेक कारणं जबाबदार आहेत. रविवारी रात्री फोंडा तालुक्यातील कवळे येथे असाच एक अपघात घडलाय.

हेही वाचाः ACCIDENT | फोंडा – सावईवेरे मार्गावरील कदंबा बसचा अपघात

नक्की काय झालं?

रविवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास पाऊण वाडा कवळे येथे दुचाकीची रस्त्यावर बसलेल्या गाईला धडक बसून अपघात झाला. या अपघातात दोघे युवक गंभीर जखमी झाले असल्याचं समजतंय.

कुणाचा अपघात?

या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये दुचाकी चालक अभिषेक उल्हास गावडे (वय वर्षं, २१, अडूळशे- बोरी)  आणि साहिल उमेश शेट तळावलीकर (वय वर्षं, २०, तळावली) या दोन युवकांचा समावेश आहे. साहिल हा अजूनही बेशुद्ध असल्याची माहिती मिळतेय.

हा व्हिडिओ पहाः Video | ACCIDENT | डंपर अंगावर येताच तरुणाची दुचाकीवरून उडी

गायीचा मृत्यू

सदर दुचाकीची धडक बसून रस्त्यावर बसलेल्या गायीचा मृत्यू झाला असल्याचं समजतंय. दोन्ही दुचाकीस्वार सुमारे दहा मीटर दूर पडले होते, अशी माहिती तेथील उपस्थितांनी दिली. दरम्यान, या भगात गतिरोधक नसल्याने वारंवार अपघात होत असून स्थानिक पंचायतीने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | FREE AMBULANCE | कुडचडे काँग्रेसचे नेते अमित पाटकर संतप्त

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!