ACCIDENT | काणकोण गुळे येथे १४ गुरांचा मृत्यू

सोमवारी रात्री पावणे एकच्या सुमारास घडली घटना; ट्रकने दिली धडक

Goan Varta Live | प्रतिनिधी

काणकोणः रात्रीच्या वेळी बहुतेक वेळा वाहन चालवत असताना चालकाला रस्त्यावरील प्राणी नजरेस पडत नाहीत. अनेकदा हे प्राणी रस्ता ओलांडत असताना किंवा रस्त्यावर बसलेले असताना अपघातात मरण पावतात. मुख्यत्वे महामार्गावर भटकणारे कुत्रे, मांजरं, गुरं वाहनांची धडक बसल्यामुळे मरण पावत असल्याच्या घटना वाढत असलेल्या दिसत आहेत. सोमवारी रात्री दक्षिण गोव्यातील काणकोण तालुक्याच्या गुळे येथे असाच एक अपघात घडलाय. या अपघातात एक आणि दोन नव्हे, तर तब्बल 14 गुरांना मरण आलंय.  

हेही वाचाः अधिवेशनात ‘गोवा फॉरवर्ड’ ‘काँग्रेस’सोबत: विजय

गुळे येथील पेट्रोल पंपजवळ अपघात

सोमवारी रात्री जवळपास पावणे एकच्या सुमारास दक्षिण गोव्यातील काणकोण तालुक्यात काळीज पिळवटून टाकणारी घटना घडलीये. गुळे येथील पेट्रोल पंपजवळील राष्ट्रीय ‌महामार्गावर रात्री एका ट्रकने धडक दिल्यामुळे एक आणि दोन नव्हे, तर तब्बल १४ गुरांना मरण आलंय. हा अपघात नक्की कसा घडला याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र 14 गुरांचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे या भागातून हळहळ व्यक्त करण्यात येतेय.

हेही वाचाः पोर्तुगीजकालीन दस्तावेज केले गायब; बनावट कराराच्या माध्यमातून जमिनींची विक्री

स्वतःचा आणि मुक्या प्राण्यांचा जीव धोक्यात घालू नका

रस्त्यावर भरधाव वाहनांच्या धडकेत एखाद्या व्यक्तीला अपघात झाला, तर प्रचंड गोंधळ माजवला जातो. परंतु, असं असताना रस्त्यावरील मुक्या प्राण्यांकडे सर्रास दुर्लक्ष करून त्यांना गाडीखाली चिरडलं जातं. सध्या राज्यात रस्ते अपघातात नाहक बळी जाणाऱ्या गायी-गुरांचं प्रमाण वाढत चाललंय. सध्याच्या आधुनिक युगात शहरीकरण अपरिहार्य आहे. परंतु, त्याचवेळी त्याच शहरात राहणाऱ्या मुक्या प्राण्यांचा जीवदेखील मोलाचा आहे, याचा विसर नागरिकांना कुठेतरी पडलाय. रस्त्यावर प्रामुख्याने रात्रीच्या वेळी भरधाव वाहनांखाली येऊन मांजर, कुत्री, गायी-गुरं आदी प्राण्यांचा नाहक बळी जात आहे. वन्यप्राण्यांच्या काही जाती सध्या नामषेश होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे वाहन चालकांनी अतिवेगाने गाडी चालवून स्वत:चा आणि प्राण्याचा जीव धोक्यात घालवू नये, एवढंच सांगणं आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | JEET AROLKAR MGP | जीत आरोलकर यांची विद्यार्थ्यांना लाखमोलाची मदत

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!