जीवन ज्योती, सुरक्षा बिमाचे लाभार्थी सुमारे ४.९५ लाख; दावे मात्र ६३९!

माहिती हक्क कायद्याखाली मिळवलेल्या माहितीतून उघड

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेंतर्गत (पीएमएसबीवाय) गेल्या सहा वर्षांत राज्यातील सुमारे ३.४६ लाख नागरिकांनी नोंदणी केलेली आहे. पण आतापर्यंत केवळ १३६ जणांनीच योजनेसाठी दावे केले आहेत. याशिवाय प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजनेसाठीही (पीएमजेजेबीवाय) सुमारे १.४८ लाख जणांनी नोंदणी केली आहे. पण त्यातील केवळ ५०३ जणांनीच दावे केल्याचे माहिती हक्क कायद्याखाली (आरटीआय) मिळवलेल्या माहितीतून उघड झाले आहे.

हेही वाचाः शिक्षा व्हिजन डिचोलीसाठी, डिचोलीवासियांसाठी

९ मे २०१५ रोजी दोन्ही योजना सुरू

नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना आर्थिक आधार म्हणून केंद्र सरकारने ९ मे २०१५ रोजी या दोन्ही योजना सुरू केल्या. योजना सुरू झाल्यानंतर राज्यातील ३,४६,२३६ जणांनी ‘पीएमएसबीवाय’मध्ये नोंदणी केली. पण गेल्या सहा वर्षांत केवळ १३६ जणांनीच या योजनेंतर्गत अर्थसहाय्यासाठी दावे केले आहेत. त्याचप्रमाणे ‘पीएमजेजेबीवाय’ अंतर्गतही सहा वर्षांत १,४८,८८० जणांनी नोंदणी केली. पण अर्थसहाय्यासाठी केवळ ५०३ जणांनीच अर्ज सादर केल्याचं माहितीत म्हटलं आहे.

हेही वाचाः बार्देशमध्ये कळंगुट श्रीमंत, तर कामुर्ली पंचायत गरीब

राज्य सरकारकडून आवश्यक तितकी जागृती नाही

योजनेंतर्गत नोंदणी केल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यातून वर्षाला निर्धारित रक्कम कापून घेतली जाते. पण, त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांमार्फत दोन लाख रुपयांच्या अर्थसहाय्यासाठी दावेच दाखल केले जात नाहीत. या दोन्ही योजनांसंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारकडून आवश्यक तितकी जागृती झालेली नाही. त्यामुळेच गोव्यात दाव्यांची संख्या अगदीच कमी असल्याचं या आकडेवारीवरून स्पष्ट होतं.

हेही वाचाः भरपूर ढिलाई आणि कर्फ्यूत वाढ! हीच तिसऱ्या लाटेसाठी अनुकूल स्थिती?

खुद्द बँक खातेधारकासह त्याच्या कुटुंबियांना माहिती नसतं

‘पीएमजेजेबीवाय’अंतर्गत कोणत्याही प्रकारे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसदारांना दोन लाखांचं अर्थसहाय्य मिळवता येतं. पण बँक खात्यातून प्रत्येक महिन्याला किंवा वर्षाला निर्धारित रक्कम कापून जात असल्याचं खुद्द बँक खातेधारकासह त्याच्या कुटुंबियांना माहिती नसते. त्यामुळेही योजनेचा बहुतांशी जणांकडून लाभ न घेतल्याचेही दिसून येत आहे.

हेही वाचाः कोरोना प्रतिबंधक लस घ्या आणि सलुनमध्ये मिळवा 50 टक्के सूट !

वारसदाराला निश्चित अर्थसहाय्य मिळू शकतं

कोविड काळात राज्यातील अनेकांचा कोविडसह इतर आजारांमुळेही मृत्यू झालेला आहे. अशा मृतांनी ‘पीएमजेजेबीवाय’अंतर्गत नोंदणी केलेली असेल तर त्यांच्या वारसदाराला निश्चित अर्थसहाय्य मिळू शकते. पण, आकडेवारीवरून बहुतांशी मृतांच्या नातेवाईकांनी अर्ज सादर न केल्याचे दिसून येतं. शिवाय कोविड काळात दाव्यांसाठी आलेल्या अर्जांची स्वतंत्र नोंद ठेवण्यात आलेली नाही, असंही माहितीत नमूद करण्यात आलं आहे.

हेही वाचाः हृदयद्रावक : दोन मुलींसह पित्यानं केली आत्महत्या

काय आहेत योजना?

‘पीएमएसबीवाय’

– अपघात विमा न नोंदवलेले व १८ ते ७० वयोगटातील सर्व व्यक्ती पात्र.
– लाभार्थींचे बँक खाते आवश्यक.
– वार्षिक १२ रुपयांचा हप्ता. दरवर्षी तो लाभार्थीच्या बँक खात्यातून आपोआप वर्ग होतो.
– हप्त्यासाठी आर्थिक वर्ष १ जून ते ३ मे असे असते.
– लाभार्थीचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा पूर्ण अपंगत्व आल्यास वारसदाराला दोन लाखांचं अर्थसहाय्य. तसंच आंशिक अपंगत्व आल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य.
– लाभार्थी एलआयसी किंवा कोणत्याही विमा कंपनीत खातं उघडू शकतो.

हेही वाचाः ‘जीसीझेडएमपी’त लोकसहभागास अटकाव करण्यासाठीच ‘एनएसए’ लागू

‘पीएमजेजेबीवाय’

– जीवन विमा न नोंदवलेले १८ ते ५० वर्षे वयोगटातील व्यक्ती.
– लाभार्थ्यांचं बँक खातं आवश्यक.
– ५० वर्षे वयाच्या आधीपासून योजनेत सहभागी असलेल्यांना वयाच्या ५५ वर्षांपर्यंत संरक्षण.
– वार्षिक ३३० रुपयांचा हप्ता. दरवर्षी लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आपोआप वर्ग होतात.
– हप्त्यासाठी आर्थिक वर्षं१ जून ते ३ मे असते.
– लाभार्थीचा कोणत्याही प्रकारे (नैसर्गिक किंवा अपघाती) मृत्यू झाल्यास वारसदाराला २ लाखांचे अर्थसहाय्य.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!