गोव्यातील खाणकाम सुरू करण्याबाबतची ‘आप’ची याचिका सर्वोच्च न्यायालयात मान्य

जानेवारी 2022 मध्ये होणार सुनावणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः गोव्यातील खाणकाम सुरू करण्याबाबतची ‘आप’ची याचिका सर्वोच्च न्यायालयात मान्य करण्यात आली जानेवारी 2022 मध्ये याबाबत सुनावणी होणार आहे, अशी माहिती ‘आप’ नेते पुती गावकर यांनी गुरुवारी माध्यमांना दिली.

हजारो लोक बेरोजगार

गोव्यातील खाणकाम बंद झाल्याने हजारो लोक बेरोजगार झाले आहे सत्ताधारी पक्षाने केवळ निवडणुकी दरम्यान खाणीचा मुद्दा उपस्थित केला आणि खाणी सुरु करण्याबाबत खाण अवलंबिताना केवळ खोटी आश्वासने दिली. अलीकडेच सावंत सरकारने महामंडळाच्या माध्यमातून खाणींचा लिलाव सुरू करणार असल्याची घोषणा केली. गेल्या तीन वर्षांत सावंत सरकारला हे काम जमले नाही असा सवाल गावकर यांनी उपस्थित केला.

खाण सुरू करण्यासाठी कायदेशीर लढा सुरू

‘आप’चे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या आश्वासनानुसार, खाण सुरू करण्यासाठी कायदेशीर लढा सुरू करण्यात आला आहे आज सर्वोच्च न्यायालयाने गोव्यातील खाण प्रश्नी जानेवारी 2022 मध्ये सुनावणी घेण्याचे आदेश दिलेत.

राज्य सरकारला राज्यातील खाण पुन्हा सुरू करण्याचा अधिकार आहे

2018 च्या सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार, राज्य सरकारला राज्यातील खाण पुन्हा सुरू करण्याचा अधिकार आहे. मात्र या खाणी सुरू करण्यासाठी सावंत सरकार चालढकल करत आहेत ते हे कुणाचे हीत जपण्यासाठी करत आहेत असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

खाण अवलंबितांना प्राधान्य दिले नाही

सरकार खाण महामंडळ स्थापन करत आहे, परंतु खाण अवलंबितांना प्राधान्य दिले नाही. आजपर्यंत केवळ केंद्र सरकार अध्यादेश काढील, संसदेत विधेयक आणतील, न्यायिक प्रक्रियेद्वारे खाणी सुरू होतील अशी नाना आश्वासनेच खाण अवलंबितांच्या माथी मारली जात होती. मात्र आम आदमी पक्षाने खाण प्रश्नी न्यायालयीन लढा आता सुरु केला .जानेवारी 2022 मध्ये होणाऱ्या सुनावणीकडे आता तमाम गोमंतकीयांचे लक्ष लागून आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!