‘आप’च्या गोवा प्रभारी आतिशी यांनी साधला भाजपवर निशाणा

गोवेकरांना नोकऱ्या देण्यासाठी तुम्ही केलेली एक गोष्ट आम्हाला सांगा

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः गोंयकरांना मागील 10 वर्षांपासून नोकऱ्या देण्यात अपयशी ठरल्याबद्दल आम आदमी पक्षाच्या (आप) गोवा प्रभारी आतिशी यांनी भाजपवर निशाणा साधला. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गोव्यातील बेरोजगारीचं संकट संपविण्यासाठी केलेल्या घोषणेनंतर राजकीय पक्षांनी धसका घेतला. या घोषणेने बेरोजगारी हा गोव्यातील प्रमुख निवडणूक मुद्दा असल्याच आतीशी म्हणाल्या. मंगळवारी भाजपने पत्रकार परिषद घेऊन गोव्यातील बेरोजगारीचे संकट फक्त भाजपच सोडवू शकते, असा दावा केला आहे त्यामुळे हे सरकार गेली 8 वर्षे का झोपलं होतं का? सवाल अतिशी यांनी उपस्थित केला.

प्रमोद सावंत यांनी आपल्या अपयशासाठी गोंयकारांना दोष देण्यावर भर दिला

बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्द करण्याऐवजी प्रमोद सावंत यांनी आपल्या अपयशासाठी गोंयकारांना दोष देण्यावर भर दिला आहे. सावंत यांनी गोव्यातील तरुणांवर कौशल्याचा अभाव असल्याचा आरोप करणं हे त्यातील एक उदाहरण, भाजप 2013 पासून सत्तेत आहे, त्यांनी गोव्यातील युवकांना कौशल्य देण्यासाठी काय केलं? यापूर्वी सावंत यांनी देवसुद्धा गोव्याला नोकऱ्या देऊ शकत नाही या विधानाचीही अतिशी यांनी आठवण करून दिली.

आतापर्यंत 1 लाख तरुणांना नोकऱ्या मिळाल्या

दिल्लीत आप सरकारचं कौशल्य विद्यापीठ आहे जे तरुणांना रोजगार देण्यास मदत करतं. आतापर्यंत या विद्यापीठत आलेल्यां एक लाख तरुणांना नोकऱ्या मिळाल्या. 65000 नवीन नागरी संरक्षण कर्मचारी नियुक्त केले आहेत. दिल्ली सरकारच्या घरोघरी सेवेमुळे तसंच नवीन शाळा, रुग्णालये आणि इतर पायाभूत सुविधा निर्माण केल्यामुळे हजारो लोकांना रोजगार मिळाला आहे, असं अतिशी म्हणाल्या.

राज्यातील खाण संकट भाजप आणि काँग्रेसने एकत्रित निर्माण केलं

राज्यातील खाण संकट भाजप आणि काँग्रेसने एकत्रित निर्माण केलं आहे. या 8 वर्षात खाण अवलंबितांच्या समस्यां जाणून घेण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी भाजपने काय केलं आहे? लॉकडाऊन आणि साथीच्या काळात पर्यटन उद्योगाला सर्वाधिक फटका बसला. यावर अवलंबून असलेले औपचारिक आणि अनौपचारिक दोन्ही भागधारकांना याचा फटका बसला आहे आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागला उद्योगात गुंतलेल्यांना एक हि रुपयाची मदत केली नाही. या क्षेत्राशी संबंधित हजारो टॅक्सी चालक आणि रिक्षाचालक आहेत ज्यांच पर्यटन ठप्प असल्यामुळे नुकसान झालं आहे. टॅक्सी ड्रायव्हर्स, हॉटेल कर्मचारी, शटल ऑपरेटर इत्यादींना कोणतेही मदत पॅकेज जाहीर केले गेले नाही या सर्वांसाठी प्रमोद सावंत यांनी केले असा प्रश्न अतिशी यांनी उपस्थित केला.

10,000 नोकऱ्या कुठे आहेत?

झेडपी निवडणुकांपासून प्रमोद सावंत हे 10,000 नोकऱ्या देण्याचं आश्वासन देत आहेत. आणि आज दामू नाईक म्हणाले की भाजप हा काम करणारा आणि न बोलणारा पक्ष आहे. त्यामुळे मी प्रमोद सावंत आणि दामू नाईक यांना विचारते की या 10,000 नोकऱ्या कुठे आहेत? या प्रकरणाची वस्तुस्थिती अशी आहे की भाजप गेल्या 8 वर्षात रोजगार निर्माण करू शकला नाही. यामुळे अरविंद केजरीवाल गोव्यात येतात आणि नोकऱ्यांविषयी बोलतात तेव्हा त्यांना राग येतो असं अतिशी म्हणाल्या.

दिल्ली हे एकमेव राज्य आहे जे केवळ स्वतःच्या बजेटमधून काम करतं

दिल्लीला केंद्राकडून निधी मिळतो या दामू नाईक यांच्या विधानावर टीका करताना आतिशी यांनी दामू नाईक यांचा खरपूस समाचार घेतला पत्रकार परिषद घेण्यापूर्वी दामू नाईक यांनी आभ्यास करावा. दिल्ली हे एकमेव राज्य आहे जे केवळ स्वतःच्या बजेटमधून काम करतं, केंद्राकडून नाही याची अस आतीशी यांनी सांगितलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!