‘आप’च्या दारोदारी भेटीनं केला पणजीवासियांच्या हृदयाला स्पर्श !

पणजीत घरोघरी संपर्क मोहिमेला जबरदस्त प्रतिसाद : वाल्मिकी नाईक

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : आम आदमी पार्टी संपूर्ण राज्यभरातील गोमंतकीयांपर्यंत पोहोचत आहे. पणजी राजधानीच्या शहरात आम आदमी पक्षाचे प्रवक्ते वाल्मिकी नाईक गोमंतकीयांना त्यांच्या घरी भेट देत आहेत आणि गोव्याबद्दल आम आदमी पक्षाची दृष्टी, विशेषत: अरविंद केजरीवाल यांची पहिली हमी तसेच लोकांवर सर्वात जास्त परिणाम करणाऱ्या समस्यांविषयी ते त्यांच्याशी बोलत आहेत. पणजीवासियांनी सांगितले, की लॉकडाऊन आणि महामारी काळात ‘आप’ने त्यांना ज्या प्रकारे मदत केली, याबद्दल ते खूप आनंदी आहेत.

पणजीतील रहिवाशांनी सांगितले, की ते वीज दर वाढीमुळे त्रस्त आहेत. त्यांचे आमदार त्यांना कोविड काळात विसरले होते. त्याचबरोबर आपकडून प्रदान केलेल्या मोफत उच्च दर्जाच्या रेशनबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. आप पक्षाने त्यांना वैद्यकीय मदत आणि घरोघरी ऑक्सिमीटर तपासणी मोहिमेद्वारे मदत केली, हे पाहून ते प्रभावित झाले आहेत.

पणजीत आमच्या घरोघरी संपर्क मोहिमेला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक घराने ठरवले आहे, की आता पुरे झाले. आता केवळ आम आदमी पार्टीलाच संधी द्यायची, असे लोकांनी ठरवले आहे, असे आम आदमी पक्षाचे प्रवक्ते वाल्मिकी नाईक म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!