‘आप’चा हल्लाबोल : मुख्यमंत्री प्रचारात व्यस्त ; कायदा-सुव्यवस्था ढासळली !

आरटीआय कार्यकर्ते नारायण नाईक यांच्यावरील हल्ल्याचा केला तीव्र निषेध

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : शनिवारी आरटीआय कार्यकर्ते नारायण नाईक यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र शब्दांत ‘आप’ने निषेध केला. ‘आप’ने म्हटले आहे की, निवडणुका जवळ येत असतानाच गोव्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. मुख्यत्वे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना याबाबत दोषी ठरवले. प्रमोद सावंत एवढे व्यस्त आहेत की, ते गृहमंत्री म्हणून आपल्या खात्याकडे लक्ष देऊ शकत नाहीत आणि त्यांना येत्या निवडणुकांच्या प्रचारात आणि भाजपाने नुकतेच सुरु केलेल्या जनसंपर्क अभियानामध्ये त्यांना अधिक रस आहे.

नारायण नाईक हे संकोळे पंचायत इमारतीतून बाहेर पडत असताना दिवसा ढवळ्या त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. ही धक्कादायक बाब आहे की, सरकारी कार्यालयाच्या बाहेरच नागरिकांवर हल्ला करण्याचे धाडस गुंडांमधे आले आहे. गोव्यातील कायदा व सुव्यवस्थेची सिटी इतक्या खालच्या पातळीवर कशी जाऊन पोचली की जिथे दिवसाढवळ्या लोकांवर हल्ले होत आहेत?

गोव्याची कायदा व सुव्यवस्था गेल्या काही काळापासून ढासळत आहे. २३ जून रोजी हार्बर पोलिस स्टेशनला संलग्न असलेल्या एका पोलिसावर वर्ना पोलिसांनी मोर्मुगावमधील एका महिलेवर बलात्कार आणि तीची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. त्याच्या दुसर्‍याच दिवशी खंडणीप्रकरणी ताब्यात घेतल्या गेलेल्या कळंगुट पोलिस स्टेशनमधील २ हवालदार आणि पोलीस निरीक्षक यांना निलंबित केले. सर्वात वाईट म्हणजे २९ जून रोजी झुआरीनगरमधील एकाच कुटुंबातील तीन सदस्यांनी वर्ना पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या छळामुळे आत्महत्या केली.

“गोव्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत बिकट पातळीवर गेली आहे. आरटीआयच्या कार्यकर्त्यावर दिवसाढवळ्या हल्ला करण्याचे प्रयत्न करणारे गुंड किती माजले झाले आहेत, याची कल्पना करा!”आप राज्य संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले.

“संपूर्ण जून महिन्यात कायदा व सुव्यवस्थेमधे भयंकर धक्कादायक प्रकरणे पाहायला मिळाली. प्रमोद सावंत आपल्या पुढील निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असताना, त्यांनी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अधिक बिकट होऊ दिली.” म्हांबरे म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!