‘आप’चे पेट्रोल दरवाढी विरोधात आंदोलन!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांचे' शतक साजरे करण्यासाठी केक वाटप केले

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः आज गोव्यात पेट्रोलच्या किंमती प्रति लिटर 100 रुपये पर्यंत पोहचल्यात. यामुळे आम आदमी पक्षाने (आप) राज्यात निषेध मोर्चा काढला. ‘आप’च्या नेत्यांनी समर्थकांसह पणजीतील जुन्या सचिवालयाजवळ आणि मडगावातील जुन्या बसस्थानक येथे मोर्चा काढला. पेट्रोल आणि स्वयंपाकाच्या गॅस दरातील वाढीविरूद्धच्या भक्कम संदेशाकडे लक्ष देणं हे यामागील उद्दीष्ट होतं. सावंत यांचा वेश परिधान केलेल्या आंदोलकांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचं शतक ‘सेलिब्रेट’ करण्यासाठी पेट्रोल भरणाऱ्या गोंयकारांना केक वाटप केलं.

गोंयकराचं कंबरडं मोडलं

गोवातील ‘आप’चे राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांनी निषेधादरम्यान माध्यमांना संबोधित करताना म्हटलं, पेट्रोल दरात प्रति लीटर 100 रुपये एवढी वाढ झाली आहे आणि स्वयंपाकाचा गॅस 900 रुपयांपर्यंत पोहचला आहे. या वाढीमुळे गोंयकराचं कंबरडं मोडलं आहे. काल भाजपने त्यांच्या पत्रकार परिषदेत हे मान्य केलं की, दारिद्र्य रेषेखालील लोकांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. पूर्वी गोव्यात बीपीएल अंतर्गत ही संख्या 30000 होती, जी आता 5 लाखांवर गेली आहे. म्हणजेच आज गोव्यातील लोकसंख्येच्या 3% पासून ते लोकसंख्येच्या 1/3 पर्यंत गेलं आहे. यामुळे गोव्यात भाजपाद्वारे झालेला विकास आणि विकासाच्या प्रचारामागील वास्तव आणि गोव्यातलं प्रत्येक घर कसं आर्थिक संकटाच्या कढीवर आहे हे दर्शवतं.

सरकारने पर्रीकरांची गोव्यासाठी असलेल्या दृष्टी पायदळी तुडवली

हे अगदी स्पष्ट आहे की, जेव्हा ‘आप’ने गोंयकरांना मोफत वीज देण्याची घोषणा केली, तेव्हा भाजप पूर्णपणे गडबडलं. मुख्यमंत्री सावंत आणि भाजप सरकारने दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची गोव्यासाठी असलेल्या दृष्टीला पायदळी तुडवलं. दयानंद बांदोडकर यांनी गोव्याच्या पायाभरणीसाठी गोव्याच्या जनतेला केंद्रस्थानी ठेवून त्या दृष्टीने पाया घातला होता, असं म्हांबरे म्हणाले.

गोंयकारांची फसवणूक

2012 मध्ये भाजपने म्हटलं होतं, की गोव्याला प्रति लीटर 60 रुपये दराने पेट्रोल मिळेल आणि आज ते पेट्रोलच्या किंमतीत शतक ठोकून 100 वर पोचलं आहे. पेट्रोलचा वास्तविक दर प्रति लीटर 30-40 रुपये आहे. पण त्यावरील कर 75% आहे. ज्यामुळे गोव्यातील पेट्रोलच्या किंमती 100 रुपयांवर पोहोचल्या आहेत. भाजपने जाहीरनाम्यात म्हटलं होतं, की ते 60 रुपये प्रति लीटर दराने गोंयकरांना पेट्रोल देतील, परंतु आता ते पेट्रोलवरील कर म्हणून 60 रुपये इतकं शुल्क आकारत आहेत, असं ‘आप’चे वाल्मीकी नाईक म्हणाले.

हा व्हिडिओ पहाः Video | POLITICS | पेडणे तालुक्यात राजकीय वातावरण तापलं

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!