सरकारी नोकऱ्या गोमंतकीयांसाठी, ‘भाजप प्रायव्हेट लिमिटेड’साठी नव्हेत!

मुख्यमंत्र्यांच्या थेट भरती उल्लेखावर आम आदमी पक्षाचा हल्ला

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : आम आदमी पक्षाने भरकटत चाललेल्या आणि मनमानी उद्योग चालविणाऱ्या भाजप सरकारचे कर्मचारी निवड भरती प्रक्रियेवरून पुन्हा एकदा सरकारचे कान टोचले आहेत. भारतीय जनता पक्षाने गोवा कर्मचारी निवड आयो\गाशी संबंधित 10 पदे भरण्यासाठी मांडलेल्या प्रस्तावाला विरोध केलाय. ही पदे गोमंतकीय लोकांसाठी आहेत आणि भारतीय जनता पार्टी प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी निगडित या नोकऱ्या नाहीत, असा सणसणीत टोला भाजपला “आप”ने लगावलाय.

“आप”चे सुरेल तिळवे यांनी हा मुद्दा मांडताना संदर्भ व दाखले दिले. मुख्यमंत्री सावंत यांना त्यांच्या समर्थक आणि हितचिंतक यांनाच नोकऱ्या द्यायच्या आहेत. आरोग्यमंत्री विश्वजित राणे या अशा गोष्टींमध्ये अग्रेसर आहेत हे आता पुराव्यानिशी सिद्ध होत असल्याचे पाहायला मिळत आहे. वायरल झालेल्या ऑडिओमध्ये विश्वजित राणे स्पष्टपणे म्हणतात की सरकारी नोकऱ्या अशाच लोकांना मिळतील जे आपल्यासाठी काम करतात. याचा अर्थ असा होतो की, भाजप समर्थक व्यक्तींनाच या नोकऱ्या दिल्या जातील.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात तब्बल 10 वर्षे कंत्राटी पद्धतीवर नर्स म्हणून काम करणाऱ्या महिलांकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. ज्यांना भाजपचा पाठिंबा होता, ज्यामध्ये प्रामुख्याने सत्तरी तालुक्यातून येणाऱ्या महिला उमेदवारांना झुकते माप देऊन सेवेत रुजू करण्यात आले. प्रशासकीय खात्यांमध्ये नोकरभरती करण्यास घातलेली बंदी आता निवडणूक जवळ आलेली असताना उठविण्याचा प्रकार म्हणजे नोकर भरतीचे गाजर लोकांना दाखवून भुलविण्याचा डावपेच आहे. असे गैरप्रकार आता गोमंतकीय जनता सहन करणार नाही आणि सरकारी नोकऱ्यांसाठी निवड करताना गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन या अधिकारीणि आणि नियमांना डावलणे या प्रकाराला जनता कडवा विरोध करेल, असे तिळवे म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!