नर्स भरतीतील घोटाळ्याची चौकशी करा- आप

आपचा भाजप सरकारवर हल्लाबोल

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : आम आदमी पक्षानं भाजप सरकारच्या नाकी नऊ आणलेत. आणखी एका घोटाळ्याची सखोल चौकशीची मागणी आपनं केलीय.

डेंटल कॉलेजमध्ये नर्स भरती प्रक्रियेदरम्यान घोटाळा झाल्याचं उघड झालं होतं. त्यानंतर आपनं सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरलंय. आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आपचे निमंत्रक आणि नेते राहुल म्हांबरे यांनी केलीय. यात नियमित पद्धतीवर काम करण्यासाठी 37 नर्सेसच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली होत. परंतु, मुलाखती आणि परीक्षा घेऊनही त्यांचे निकाल जाहीर करण्यात आले नाहीत. तत्पूर्वीच 37 नर्सेस कामावर रुजू झाल्यानं त्यांची नियुक्त कोणी केलीय, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. आरोग्यमंत्र्यांनी आपल्या तसंच कॅबिनेटमधील सहकारी मंत्र्यांच्या मर्जीतील उमेदवारांना नियुक्ती पत्रं दिल्याचा आपचा आरोप आहेय. यातील बहुतांश नर्सेस सत्तरीतील असल्याचा दावा आपनं केलाय.

हेही वाचा –

जिंदाल, अडाणींसारख्या करचुकव्यांवर कारवाई कधी होणार?

खरंच अल्वारा जमीन सरकारच्या मालकीची?

भाजपला आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी सज्ज, प्रफुल्ल पटेलांचे संकेत

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!