पितळ उघडं पडेल म्हणून वीजमंत्री काब्राल घाबरले!

आम आदमी पार्टी : चर्चेचं आव्हान न स्वीकारल्याबद्दल आश्चर्य

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : आम आदमी पक्षानं राज्याचे वीज खात्याचे मंत्री नीलेश काब्राल (Nilesh Cabral) यांनी दिलेलं आव्हान स्वीकारलं. मात्र खुल्या चर्चेसाठी केलेल्या प्रतिआव्हानाला वीजमंत्र्यांकडून प्रतिसाद न आल्याबद्दल आम आदमी पक्षानं आश्चर्य व्यक्त केलंय. सार्वजनिक स्तरावर जनतेसमोर आपलं खोटारडेपणाचं पितळ उघडं पडू नये, असं वाटल्यानंच काब्राल यांनी माघार घेतली असावी, असं ‘आप’नं म्हटलंय.

दिल्ली आणि गोव्यातील वीज वापराची सद्यस्थिती यावर खुली चर्चा अथवा वादविवाद करण्यासाठी काब्राल यांनी दिल्लीतील कुठल्याही “आप”च्या आमदाराला गोव्यात येण्याचं खुलं आव्हान दिलं होतं. दिल्लीतील आपचे आमदार व पेशाने चार्टर्ड अकाउंटंट असलेले राघव चड्डा यांनी हे आव्हान स्वीकारल्याचं जाहीर केलं असून येत्या 17 रोजी ते गोव्यात येत आहेत. वीजमंत्र्यांबरोबर चर्चा करण्यासाठी “आप “तर्फे राघव चड्डा येतील, असं “आप “तर्फे यापूर्वीच जाहीर करण्यात आलं होतं. चड्डा हे पेशाने सीए असून दिल्ली जल बोर्ड या मंडळाचे अध्यक्ष आणि आम आदमी पक्षाचे सर्वात तरुण प्रवक्ते आहेत. दिल्लीतील वीज टॅरिफ धोरणाविषयी गोव्याचे वीजमंत्री काब्राल यांच्याशी चर्चा करण्यास तयार आणि इच्छुक आहेत.

काब्राल यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दावा केला होता की, गोव्यातील वीज दर पत्रक अथवा पावर टॅरिफ हे दिल्लीतील दरापेक्षा स्वस्त आहे आणि दिल्लीतील कुठल्याही “आप ” प्रतिनिधीला या दर पत्रकाविषयी चर्चा करण्याची इच्छा असेल, तर त्या व्यक्तीला गोव्यात येण्यासाठी विमानाची तिकिटे ते स्वतः प्रायोजित करतील. “आप “नं हे आव्हान लगेच स्वीकारलं आणि जाहीर केलं की दिल्ली जल बोर्ड या जल मंडळाचे अध्यक्ष येत्या 17 नोव्हेंबर रोजी गोव्यात येतील आणि या विषयावर चर्चा करतील आणि गोव्याच्या मंत्र्यांना चर्चेसाठीची वेळ आणि स्थळ कळविण्याचे आवाहन केले.

पण, वीज मंत्र्यांनी आपच्या आव्हानाला प्रतिसाद दिलेला नाही आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकलीय असं दिसते. सार्वजनिक स्तरावर जनतेसमोर आपलं खोटारडेपणाचं पितळ उघडे पडू नये असं त्यांना वाटतं. कारण त्यांनी आतापर्यंत त्यांनी गोव्यातील लोकांसमोर बरीच चुकीची आणि गैर अशी माहिती प्रसूत केलेली आहे, असं “आप “नं म्हटलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!