‘आप’कडून राज्यात २४० ऑक्सिजन तपासणी केंद्रांची सुरुवात

‘आप’चे गोवा संयोजक राहुल म्हांबरेंची माहिती; भविष्यात ही संख्या ३०० पर्यंत वाढवणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः आम आदमी पक्षाने संपूर्ण गोव्यात ऑक्सिजन तपासणी केंद्रे सुरू केली आहेत, जिथे लोक सहजरित्या जाऊन ऑक्सिजन संपृक्तता पातळी तपासू शकतात आणि त्यानुसार जंगलातील आगीसारख्या पसरणार्‍या कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी आवश्यक ती कारवाई केली जाऊ शकते, असं ‘आप’चे गोवा संयोजक राहुल म्हांबरे यांनी सांगितलं.

हेही वाचाः गोवा शिक्षण मंडळाने काढलेल्या परिपत्रकात क्रीडा सवलतीच्या गुणांचा उल्लेख नाही

२४० ऑक्सिजन तपासणी केंद्रे सुरू

सध्या ‘आप’कडून २४० ऑक्सिजन तपासणी केंद्रे सुरू करण्यात आलीयेत. लवकरच ती ३०० पर्यंत वाढविली जातील. आप कार्यकर्त्यांच्या ठिकाणी ही केंद्रे उभारली गेली आहेत आणि केंद्राची ओळख पटवण्यासाठी बॅनर लावले आहेत. जर ऑक्सिजन संपृक्तता पातळी ९५ च्या खाली असेल, तर संबंधित व्यक्तीस सल्ला घेण्यासाठी वैद्यकीय डॉक्टरांशी संपर्क साधावा लागेल, असं म्हांबरे म्हणाले.

हेही वाचाः करोनावरील उपचारांसाठी इव्हर्मेक्टिन, डॉक्सिसाईक्लिन औषधांचा वापर थांबवा

या केंद्रांचा लाभ घ्यावा

जेव्हा ही केंद्रे प्रथम कुंकळ्ळी आणि फातोर्डा येथे सुरू करण्यात आली तेव्हा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी त्यांना अडथळा आणला आणि लोकांना विनाशुल्क पुरविली जाणारी सेवा थांबवाली. आता ही सेवाही विनामूल्य आहे आणि ज्यांना थोडाशी अस्वस्थता जाणवत असेल त्यांना येऊन स्वतःची ऑक्सिजनची पातळी तपासावी, असं म्हांबरेंनी सांगितलं.

हेही वाचाः या ‘5’ गोष्टींवर बोलू शकतात मोदी

कोरोना लढ्यात ‘आप’कडून विविध उपक्रम

कर्फ्यूच्या पहिल्या दिवसापासून होम आयझोलेशनमध्ये असलेल्या रूग्णांमध्ये ऑक्सिमीटरचं वितरण,शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या कुटुंबातील सदस्यांना जेवण पुरवल्यानंतर, कोरोनाशी लढण्यासाठी ‘आप’कडून या अजून एका उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!