उद्योगातील अडथळे सरकारच्या नाकर्तेपणामुळे!

'आप'चे सुरेल तिळवे यांची टीका. भाजपचे नाव बदलून ‘भारतीय जनता प्रायव्हेट लिमिटेड’करा.

सिद्धार्थ कांबळे | प्रतिनिधी

पणजी : भाजपचे नाव बदलून ‘भारतीय जनता प्रायव्हेट लिमिटेड’ असे नामकरण का नाही करत, असा सवाल ’आप’ने (AAP) भाजपला विचारला आहे. जीआयडीसीचे अध्यक्ष तथा भाजपचे आमदार ग्लेन टिकलो (Glenn Ticklo) यांच्या वक्तव्यानुसार, मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री व्यवसायांना परवानगी देत नसल्यामुळे राज्यात मंदी वाढतच आहे, अशी टीका केल्यावर रविवारी आपचे नेते अ‍ॅड. सुरेल तिळवे (Surel Tilave) यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले.

आधीच करोनामुळे बहुतेक उद्योग बंद असल्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. राज्यातील सरकार विविध उद्योगांच्या विकासासाठी काम करण्याऐवजी जीआयडीसीच्या माध्यमातून भाजपच्या विकासासाठी काम करत आहे, हे लक्षात घेता त्यांनी आपले नाव बदलून भारतीय जनता प्रायव्हेट लिमिटेड ठेवावे. या वक्तव्यामुळे हे स्पष्ट होते की, सरकार उद्योग-व्यवसायांच्या उपाययोजनांवर विचार करत नाही आहे. सरकारचा नाकर्तेपणा उद्योग सुरू करण्यात किंवा उद्योग सुरळीत चालवण्यात अडथळे निर्माण करत आहे. याला हे सरकारच कारणीभूत आहे, असे टिकलो म्हणाले होते. त्यांचे विधान औद्योगिक विकास करण्यासाठी सरकार असमर्थ असल्याचे स्पष्ट करते.

कामगार निधीत भ्रष्टाचार!
कामगार निधी घोटाळा हे भ्रष्टाचाराचे मोठे उदाहरण आहे. यात भाजपचे कार्यकर्ते आणि जि. प. उमेदवारांचे नाव औद्योगिक कामगार यादीमध्ये नमूद केले आहे. योजनेतील लाभार्थ्यांना मिळालेल्या पैशाचा त्यांनी लाभ घेतला आहे. तरुणांना नोकरी द्यायची आहे आणि उद्योजकांना नवीन व्यवसाय व उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करायचे आहे, तर हा भ्रष्टाचार थांबवावा लागेल. घोटाळा थांबवण्यासाठी भारतीय जनता प्रायव्हेट लिमिटेडचा अंत करावा लागेल, असे आप नेते अ‍ॅड. सुरेल तिळवे म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!