काँग्रेसचा नाश, भाजपची घसरण, आपचा चढता आलेख

इंडिया अहेडच्या सर्वेक्षणाचा आधार घेत आपचा दावा

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : राज्यात आपला पसंती मिळत असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं. इंडिया अहेड या वृत्तवाहिनीनं यासंदर्भातला सर्वे केलाय. या सर्वेनुसार आम आदमी पार्टी गोव्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या काही इंच अंतरांवर मागे असल्याचं समोर आलंय. त्यामुळे गोव्यात आपला जोरदार पसंती मिळत असल्याचा दावा केला जातोय. दुसरीकडे कांग्रेसची राज्यात संपूर्णपणे नासधूस होत असल्याचे दिसून येत असल्याचं इंडिया अहेड या वृत्तवाहिनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार समोर आले आहे.

‘आप’चे प्रवक्ते अ‍ॅड. सुरेल तिळवे यांनी खुलासा केला की,

सध्याच्या सर्वेक्षणात भाजप आघाडीवर असले, तरी निवडणुका जवळ येता येता आपला निश्चितच अव्वल स्थान मिळेल. ‘आप’ काही टक्केवारीने सत्ताधारी पक्षाच्या मागे राहत एक मजबूत दुसरी निवड म्हणून पुढे येत आहे.

“गोयंकरांना हे समजले आहे की कॉंग्रेसला मतदान करणे हे भाजपला मतदान करण्यासारखेच आहे, कारण ते आपले निवडलेले आमदार भाजपाकडे पाठवतात,” सुरेल म्हणाले की, गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेसने आपले १७ आमदार भाजपाला दिले आहेत जी याक्षणी राज्यावर राज्य करतंय.

इंडिया अहेडचा सर्वे

अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत घडवून आणलेल्या बदलांमुळे आणि ‘आप’ने दिल्लीत लोकांना मोफत वीज, पाणी, शिक्षण आणि आरोग्य सेवा पुरविली यामुळे अरविंद केजरीवाल यांना ३२ टक्के गोयंकर सर्वात आवडते राजकारणी म्हणून पाहतात, असंही तिळवे यांनी म्हटलंय.

त्याशिवाय २२ टक्के गोयंकरांनी पुढील विधानसभा निवडणुकीत आपला मतदान करणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले,

“निवडणुका होण्याच्या १४ महिन्यांपूर्वीची ही आकडेवारी असली तरी आपणास उर्वरित जागा व्यापून भाजपापेक्षा जास्त मते मिळतील याची खात्री दिली जाऊ शकते.”

गोव्यात आप हा एकमेव विरोधी पक्ष आहे कारण कॉंग्रेस अक्षरशः अपयशी ठरले आहे आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी किंवा गोवा फॉरवर्ड पार्टीवरील विश्वास लोक गमावून बसले आहे, असे सुरेश तिळवे यांनी ठासून सांगितले.

गोव्यामधील भाजप आणि आप मधे फरक केवळ १० टक्के आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले असता सुरेल म्हणाले की, पुढच्या निवडणुकीतील लढाई ही भाजप आणि आप यांच्यात होईल हे स्पष्ट आहे. दिल्लीचे नेते राघव चड्डा यांनीही गोवा दौऱ्यादरम्यान हेच म्हटलं होतं.

गोव्यात कॉंग्रेस पुढचे सरकार बनविणार असे १० टक्के गोयंकर म्हणाले तर २८ टक्के गोयंकर म्हणाले की आप पुढील सरकार बनवणार. त्याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे केवळ ११ टक्के लोकांनी राहुल गांधींना लोकप्रिय नेते मानले तर तब्बल ३२ टक्के लोकांनी अरविंद केजरीवाल यांना पसंती दिली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!