स्वतःची पत वाचविण्यासाठी काब्राल यांची धडपड!

'आप' नेते वाल्मिकी नाईक यांची टीका

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : चर्चेपासून दूर पळण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर वीजमंत्री निलेश काब्राल (Nilesh Cabral) यांनी एका सर्वसामान्य गोवेकराशी चर्चा करण्याची हिम्मत आणि बळ एकवटलं. हे आव्हान स्वीकारण म्हणजे आपली पत आणि प्रतिष्ठा वाचविण्यासाठी केलेला एक प्रयत्न आहे, असं प्रतिपादन आम आदमी पक्षाचे नेते वाल्मिकी नाईक (Valmiki Naik) यांनी केलं.

भाजप हायकमांड या वादविवाद आणि चर्चेविषयी प्रचंड संतापलेली असून नाखूष आहे. काब्राल यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे दस्तऐवज किंवा निश्चित आकडे किंवा वास्तव दर्शवणारी कुठलीही माहिती वगैरे नसली तरीही स्वतःची पुढे होऊ शकणारी नामुष्की आणि इज्जतीचा होणारा बभ्रा रोखण्यासाठी त्यांना आता चर्चेत उतरणे नाईलाजाने मान्य करावे लागत आहे, असे वाल्मिकी म्हणाले.

काब्राल यांना माहीत आहे कि, दिल्ली वीज प्रणालीच्या मॉडेलची तुलना गोवा भाजपच्या मॉडेलशी अजिबात होऊ शकत नाही. प्रोटोकॉलच्या गोष्टी केवळ निमित्त होते, असे नाईक म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!