‘मुख्यमंत्री नळाच्या पाण्यासाठी हवेतून पाणी आणणार का?’

Goan Varta Live | प्रतिनिधी
म्हापसा : गोवा सरकारने घोषित केलेल्या प्रत्येक घरासाठी 100% नळ कनेक्शन देण्याच्या दाव्यावर आपने कडाडून टीका केली आहे. गोमंतकीयांच्या डोक्यातून म्हादईचा विषय वळविण्यासाठी चाललेले हे प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आलाय. गोव्याने माय म्हादई जर सोडली तरी गोमंतकीयांना पाण्याची कमतरता भासणार नाही, असा खोटा संदेश सरकार देऊ इच्छित असल्याचं आपने म्हटलंय.
“काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी हवेतून पाणी काढण्याविषयी सांगितलं होतं. आता मुख्यमंत्री सावंतांना ही युक्ती बहुतेक समजली असावी. कारण म्हादई पूर्णपणे कोरडी वाहत असताना प्रत्येक घरात पिण्यासाठी पाणी देण्याचा हा एकमेव मार्ग आहे”, असं आपचे राहुल म्हांबरे (Rahum Mhambare) यांनी म्हटलंय.
राहुल म्हांबरे म्हणतात…
गोव्याच्या सरकारला खोटी आश्वासनं द्यायची सवयच झाली आहे, असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधलाय. आधी त्यांनी गोव्याला शौचमुक्त, नंतर कोविड मुक्त आणि आता 100% नळाचे पाणी द्यायचं आश्वासन दिलंय. मुख्यमंत्री सावंतांनी म्हादईविषयी खरे मुद्दे गोवेकरांच्या लक्षात आणण्याऐवजी, बेजबाबदार विधाने करून गोमंतकियांचे लक्ष वेधू नये. गोव्यातील लोकांची अपेक्षा आहे की आपण एक निर्णायक नेता व्हावे आणि आमची म्हादई परत मिळविण्यासाठी खरेखुरे प्रयत्न करावे. गोव्यातील सोळा लाख लोकांच्यावतीने बोलावं …… ह्या सगळ्यात आम्ही सर्वजण नक्कीच तुमच्या तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू.
ठोस पावलं उचलण्याची वेळ
आम्ही सरकारला चुकीचे विधाने करु देणार नाहीत, आम्ही आमचे कार्य चालूच ठेवणार आहोत आणि भाजपचा अजेंडा उघडकीस आणून देऊ, असंही म्हांबरे यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री सावंत (Dr. Pramod Sawant) यांनी काहीतरी ठोस पावले उचलण्याची वेळ आता आली आहे आणि ते काय पावले उचलतात याकडे संपूर्ण गोव्याचं लक्ष आहे.
The dry basin of our #mhadei is a testimony of water woes all of us will suffer in Goa.
— Rahul Mhambre (@RahulMhambre) October 10, 2020
As usual but Goa Govt makes a false bravado of providing all households with tap water in 2024.
The Goa govt continues to remain in illusion.