‘आप’चे उमेदवार प्रशांत नाईक निवडणुकीच्या रिंगणात

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्टः विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाचे उमेदवार प्रशांत नाईक यांनी मंगळवारी कुंकळ्ळीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला.
आप’ सत्तेत आल्यास ५० खाटांचे शहरी आरोग्य केंद्र सुरू करेन
नाईक म्हणाले, कुंकळ्ळीने भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना पाहिले आणि निवडून दिले पण तरीही कोणताही विकास झालेला नाही. चांदोर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र नाही. कुंकळ्ळी हे शहरी ठिकाण आहे, परंतु बाळ्ळी प्राथमिक आरोग्या केंद्राखाली आरोग्य सेवा आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आप’ सत्तेत आल्यास ५० खाटांचे शहरी आरोग्य केंद्र सुरू करेन असं आश्वासन त्यांनी दिलं.
लोकांना भाजप आणि काँग्रेस पक्ष नको
लोक म्हणत आहेत की त्यांना आता भाजप आणि काँग्रेस पक्ष नको आहेत. त्यांनी लोकांसाठी काहीही केले नाही आणि केवळ त्यांच्या आणि त्यांच्या समर्थकांच्या विकासासाठी काम केले. एवढी वर्षं पाहिल्यानंतर, गावकरी खरोखरच ‘आप’च्या हमींच्या प्रतीक्षेत आहेत. भ्रष्टाचारमुक्त कारभाराची नितांत गरज असल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे आणि ते फक्त आपच देऊ शकते’, असंही ते म्हणाले.
हेही वाचाः ‘आरजी’ची सहावी यादी जाहीर
कुंकळ्ळीचे तरुण थकले आहेत
वीज, शाळा आणि आरोग्यसेवेच्या केजरीवाल मॉडेलने गोवेकर आधीच प्रभावित झाले आहेत. कुंकळ्ळीमधील अनेक तरुणांनी बेरोजगार तरुणांच्या कुटुंबाला ‘आप’ने वचन दिलेले 3000 रुपयांच्या मदतीसाठी स्वारस्य दाखवले आहे. कुंकळ्ळीचे तरुण थकले आहेत आणि निराश झाले आहेत. अरविंद केजरीवाल यांचे गोवेकरांसाठी खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये 80% आरक्षणाचे आश्वासन दिले आहे याची आठवण त्यांनी केली. तरुणांना त्यांच्याच जमिनीत उभारल्या जाणाऱ्या कारखान्यांमध्ये नोकऱ्या मिळत नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली.