प्रसंगी तुरुंगात जाऊ, पण हार मानणार नाही!

'आप'चा निर्धार : मुख्यमंत्र्यांवर पलटवार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : वेळ पडली, तर आप कार्यकर्ते स्वतःवर 100 एफआयआर झेलण्यास तयार आहोत. पण गोव्याचं रूपांतर कोळसा खाणीत होण्यापासून आणि रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला रोखू. हवे तर तुरुंगात टाका, पण आम्ही झुकणार नाही, असं इशारा आप नेत्यांनी दिला.

पक्षाचे प्रवक्ते संदेश तेलेकर यांनी तीव्र शब्दात सरकारवर हल्ला चढवला. 1 नोव्हेंबर रोजी चांदोर येथे झालेल्या निषेध फेरी आणि जाहीर सभेच्या विरोधात सरकारकडून प्राथमिक माहिती अहवाल तक्रार (एफआयआर ) दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीचा तीव्र निषेध आम आदमी पक्षाने केला असून सरकारवर तिखट शब्दांमध्ये पलटवार केला आहे. हा एफआयआर आंदोलकांना येत्या 8 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी आहे. नोंद करण्यात आलेली एफआयआर हेच सूचित करते या चळवळीला दिसत असलेला वाढता प्रतिसाद बघून सरकार घाबरलेले आहे.

तळेकर म्हणाले की, एफआयआर नोंद होईल या भीतीने लोक दवरली येथील बैठकीला येणार नाहीत, असं सरकारला वाटत असेल. पूर्वीपेक्षा जास्त लोक तिथे येतील आणि सरकारने अवलंबिलेल्या दादागिरीच्या विरोधात आपला राग उघडपणे व्यक्त करतील.

तेलेकर म्हणाले, गोवा फॉरवर्ड पक्षाच्या नेत्यांचे तसेच पक्ष सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांचे नाव त्याच्यामध्ये नसणे हेही समजू शकते आणि कारण प्रकल्पाला मान्यता आणि हिरवा कंदील दाखविला गेला होता, त्यावेळी हीच माणसे सरकारचा भाग होती.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!