मुख्यमंत्र्यांकडून गोंयकारांना दिलासा

‘आप’कडून लॉकडाऊन वाढीच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं स्वागत

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाशी सहमती दर्शवत आम आदमी पक्षाने (आप) शुक्रवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुन्हा एकदा गोंयकारांना दिलासा दिला आहे असं म्हटलं. तसंच अखेर लॉकडाऊनची मुदतवाढ करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्यानं मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलं.

हेही वाचाः मगोपच्या प्रवीण आर्लेकरांची चांदेल प्रकल्पावर धडक कार्यवाही

केजरीवालांच्या मॉडेलचं अनुसरण करा

‘आप’च्या गोव्याचे संयोजक राहुल म्हांबरे यांनी लॉकडाऊन वाढीच्या निर्णयाशी सहमती दर्शवताना मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे मागणी केली, की त्यांनी कोरोनामुळे पीडित लोकांना मदत करण्याच्या केजरीवालांच्या मॉडेलचं अनुसरण करावं आणि दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी याआधी पुरविल्या गेलेल्या सुविधा गोंयकारांनादेखील द्याव्यात.

हेही वाचाः ज्येष्ठ पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचं निधन

केजरीवाल मॉडेलमधील योजना

दिल्लीतील केजरीवाल मॉडेलची म्हांबरेंनी पुन्हा एकदा थोडक्यात माहिती दिली.

केजरीवाल सरकारने दिल्लीत कोरोनाने ज्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल, अशा कुटुंबाला ५० हजार रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली.  

ज्या मुलांच्या आई वडिलांचा किंवा दोघांपैकी एकाचा कोरोनाने मृत्यू झाला असेल, तर अशा 18 वर्षांखालील मुलांना प्रत्येकी दरमहा अडीच हजार रुपये वय वर्षं 25 पर्यंत सानुग्रह भत्ता दिला जाणार आहे. तसंच त्या मुलांचं शिक्षण दिल्ली सरकार मोफत करणार आहे.

ज्या कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल, तर अशा कुटुंबाला सानुग्रह निधीव्यतिरिक्त अडीच हजार रुपये मासिक पेन्शन दिली जाणार आहे.

मे महिन्यात प्रत्येक शिधापत्रिका धारकांना मोफत 10 किलो अन्नधान्य दिलं जाणार आहे.

गोंयकारांनाही अशाच प्रकारच्या सुविधा पुरविल्या पाहिजेत, अशी मागणी म्हांबरेंनी मुख्यमंत्र्यांनाकडे केली. याशिवाय मोटारसायकल चालक, लहान व्यवसायिक आणि विक्रेत्यांच्या अडचणींचा विचार करून त्यांनाही दिलासा देण्याचं आवाहनही म्हांबरेंनी यावेळी केलं.

हेही वाचाः कोविड-19च्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स

हे मुख्यमंत्र्यांच्या असंवेदनशीलपणाचं लक्षण

शिवाय गृहाधार देयकेदेखील रखडली आहेत, हे ही लक्षात घेतलं पाहिजे. पेट्रोलच्या वाढत्या 91 रुपयांच्या किमतीमुळे गोंयकारांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. गृहाधारांच्या देयकाकडे दुर्लक्ष करणं आणि आणखी त्यात पेट्रोलच्या किंमतीत वाढ करून गोंयकारांच्या जखमेवर मीठ चोळणं, हे मुख्यमंत्र्यांच्या असंवेदनशीलपणाचं लक्षण आहे, असे ‘आप’ गोव्याच्या उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!