आधार कार्ड, पॅन कार्ड जन्मतारखेचा पुरावा नाही !

अलाहाबाद उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : अलाहाबाद उच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. शाळेच्या दाखल्यावर जन्म तारखेचा उल्लेख असेल तर आधार कार्ड आणि पॅन कार्डला वयाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरावेच, असं बंधनकारक नसल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. न्यायमूर्ती रोहित राजन अग्रवाल यांच्या एकल खंडपीठाने एका सुनावणीदरम्यान हा निकाल दिला आहे. अनिकेत आणि अन्य एका व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने सुनावणी केली. लग्नासंदर्भातील या याचिकेमध्ये अर्जदारांनी २८ फेब्रुवारी २०२१ रोजी आपण सज्ञान होतो त्यामुळेच न्यायालयाने आमचा जगण्याचा आणि खासगी स्वांत्र्याच्या हक्कांचं संरक्षण करावं अशी मागणी केलीय. तसेच इतर कोणीही आमच्या खासगी वैवाहिक आयुष्यात ढवळाढवळ करु नये असंही याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं.

अर्जदाराने दिलेल्या माहितीनुसार २१ वर्षीय अंकित हा हिंदू असून जाट समाजाचा आहे. या अर्जासोबत वयाचा दाखला म्हणून आधारकार्ड आणि पॅनकार्डची प्रत देण्यात आली होती. त्याचप्रमाणे याच प्रकरणातील अर्जदार मुलगी ही १९ वर्षांची आहे. तिचंही आधार आणि पॅन कार्ड पुरावा म्हणून सादर करण्यात आलं. गावकरी आणि मुलीच्या घरचे जबरदस्तीने तिला पुन्हा घरी घेऊन जाण्याचा आणि आमचा संसार मोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं अर्जात म्हटलं आहे. जीवाला धोका असल्याचं समजल्यानंतर अर्जदारांनी २८ फेब्रुवारी २०२१ रोजी स्थानिक पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केल्याचंही सांगितलं.

या दोघांनाही २२ मार्च २०२१ रोजी लग्नाच्या नोंदणीसाठी अर्ज केला होता, मात्र सुदीप शुक्ला यांनी अर्ज करणारी मुलीचा जन्म हा ३ नोव्हेंबर २००४ चा असून ती अल्पवयीन असल्याचा दावा केला. हिंदू विवाह कायदा १९५५ नुसार ही मुलगी अल्पवयीन असल्याचा दावा प्रतिपक्षाने केला. तसेच याचा पुरावा म्हणून उत्तर प्रदेश शिक्षण मंडळाने दिलेला २७ ऑक्टोबर २०२० रोजी जारी करण्यात आलेला शाळेचा दाखलाही न्यायालयासमोर दाखल करण्यात आला. तसेच न्यायालयासमोर शाळेचा दाखलाही पुरावा म्हणून सादर करण्यात आला. तसेच या मुलाविरोधात काही गुन्हे दाखल असल्याचंही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आलं. या मुलाने १७ वर्षीय मुलीशी लग्न केल्याचा दावा प्रतिपक्षाने केला.

मात्र शाळेच्या दाखल्यावरची तारीख बदलण्यात आली असल्याचा दावा या दोघांनी केला. या मुलीचा जन्म २४ ऑगस्ट २००१ रोजी झाल्याचं आधीच्या दाखल्यावर होतं. मात्र आठवीनंतर नववीमध्ये मुलीचा दाखला बदलण्यात आल्याचं अंकितच्या वकिलांनी न्यायालायात सांगितलं. या प्रकरणामध्ये खोटा दाखला दाखवून आपल्या मुलीशी लग्न केल्याच्या प्रकरणात मुलीच्या आईने मुलाविरोधात तक्रार दाखल केल्याचं प्रतीपक्षाने न्यायालयात सांगितलं.

वैद्यकीय चाचण्यांच्या अहवालामध्ये मुलीचं वय हे १९ पेक्षा अधिक असल्याची माहिती समोर आली. मुलगी अल्पवयीन असताना अंकितने तिला पळून नेल्याचा दावा मुलीच्या आईने केला. तसेच न्यायालयासमोर सादर केलेल्या दाखल्यावरील तारीख योग्य असल्याचंही त्या म्हणाल्या. मात्र न्यायालयाने ज्यावेळी लग्न झालं त्यावेळी ही मुलगी अल्पवयीन होती हे शाळेच्या दाखल्यावरुन स्पष्ट होत होतं तर वैद्यकीय दाखल्यावरुन मुलीचं वय १९ हून अधिक असल्याचं स्पष्ट झाल्याने न्यायालयाला कोणत्या बाजूने कौल द्यावा, हे निश्चित करणं गरजेचं होतं.

न्यायालयाने निकाल देताना अर्जदार मुलीने शाळेच्या दाखल्यावरील तारखेवर आक्षेप घेतला नाही. त्यामुळेच वैद्यकीय चाचण्यांचा निकाल बाजूला ठेवत न्यायालयाने या मुलीचा जन्म ३ नोव्हेंबर २००४ रोजी झाल्याचं गृहित धरता येईल असं स्पष्ट केलं. यासाठी न्यायालयाने एका जुन्या निकालाचा आधार घेतला.  तसेच या मुलीच्या आईने न्यायालयासमोर दिलेल्या जबाबामध्ये शाळेच्या दाखल्यावरील तारीख योग्य असल्याचा आधार घेत न्यायालयाने शाळेच्या दाखल्यावरील तारीख बरोबर असल्यांच स्पष्ट झाल्यानंतर आधारकार्डवरील किंवा वैद्यकीय चाचण्यांच्या अहवालाला प्राधान्य देता येणार नाही. २०१९ मधील एका निकालाच्या आधारे आधार कार्ड हा वयाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नसल्याचं न्यायालायने स्पष्ट केलं. याच आधारे न्यायालायने लग्न झालं तेव्हा मुलगी अल्पवयीन होती असा निर्णय दिला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!