गणपत पार्सेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयात ‘प्रसारमाध्यमांचे तंत्र व रोजगाराच्या संधी’ विषयावर कार्यशाळा संपन्न…

पाया भक्कम असल्यास जडणघडण मजबूत होऊ शकते : संपादक किशोर नाईक गांवकर

Goan Varta Live | प्रतिनिधी

पेडणे : येथील हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या गणपत पार्सेकर शिक्षणाशास्त्र महाविद्यालयात ‘प्रसारमाध्यमांचे तंत्र व रोजगाराच्या संधी’ ह्या विषयावर कार्यशाळा ज्ञानदा सभागृहात संपन्न झाली. ह्या कार्यशाळेचे उद्घाटन गोवन वार्ता लाईव्हचे संपादक किशोर नाईक गांवकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन लक्ष्मीकांत पार्सेकर, प्राचार्य उदेश नाटेकर, मराठी विभाग प्रमुख डॉ गीता येर्लेकर व कोकणी विभाग प्रमुख प्रा वैशाली परब उपस्थितीत होत्या.
हेही वाचाःएटीएममधून अनेकांना आले जास्त पैसे, नक्की कुठे आणि कसा घडला हा प्रकार? वाचा सविस्तर…

प्राथमिक पाया भक्कम असल्यास जडणघडण मजबूत होते

प्रसारमाध्यमातील वृत्तपत्र व्यवसायात अनेक संधी उपलब्ध आहेत. मात्र आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने जागा रिक्त आहेत. पत्रकारितेसाठी भाषेवर प्रभुत्व महत्वाचा घटक आहे. सरकारी सेवक बनण्याची प्रत्येकाची इच्छा दिसून येते, मात्र सरकारी अधिकारी बनण्यासाठी जीपीएससी परीक्षा देण्यासाठी कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही हे दुर्दैव आहे. अलीकडे राज्यात लाईन हेल्पर पदांसाठी पदवीधर, इंजिनियर युवक सहभागी होते. विद्यार्थ्यांचा प्राथमिक पाया भक्कम असल्यास जडणघडण मजबूत होऊ शकते. प्रसारमाध्यम व शिक्षक ही वेगळी क्षेत्रे असली तरी खूप दृष्ट्या समान आहेत, असे आपले मत आहे. शिक्षक पुस्तकातील तसेच सामान्य ज्ञानाची माहिती तर पत्रकार हा समाजातील बऱ्या वाईट गोष्टी जनतेसमोर वर्तमानपत्राच्या माध्यमातून नजरेत आणीत असतो, असे मत गोवन वार्ता लाईव्हचे संपादक किशोर नाईक गांवकर यांनी व्यक्त केले.
हेही वाचाःGoa police : पोलीस खात्यातील ‘या’ सात उपअधीक्षकांच्या बदल्या…

पृडंन्ट चॅनलचे संपादक प्रमोद आचार्य…

प्रसारमाध्यमे सशक्त बनण्याची खरी गरज आहे. ह्या क्षेत्रांत अनेक संधी आहेत. मात्र सर्वांना चाकोरीबद्ध व्यवसाय करण्याकडे कल असतो. एखादी कठीण नव्हे परंतु अनोखी, अनाकलनीय गोष्ट करण्याची ऊर्जा गवसली पाहिजे व त्याकडे लक्ष दिले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे त्यातून आनंद घ्यायला पाहिजे. पत्रकारितेत 24 तास सजग असले पाहिजे. अलीकडे महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे यांची पहाटे तीन वाजता मुख्यमंत्री पदी शपथ घेतल्यानंतर पणजीत एकमेव पृडंन्ट चॅनलने मुलाखत घेतली व ती देशांतील अनेक चॅनलनी मागवून घेतल्याचे आचार्य यांनी सांगितले. सदर मुलाखत जीवनातील अविस्मरणीय घटना ठरली आहे. अलीकडे प्रत्येकाकडे मोबाईल असल्याने सर्वचजण रिपोर्टर असतात, कारण कसल्याही गोष्टींची रिकॉर्डिंग तुम्ही पोहचवत असतात, त्याची वैधता वर्तमानपत्रातून कळू शकते.
हेही वाचाःDaboli Airport : दक्षिण गोव्यातील जनतेनं निश्चिंत रहावं!

नवप्रभाचे संपादक परेश प्रभू…

प्रसारमाध्यमात सध्या भयंकर स्पर्धा असून त्यात टिकून राहायचे असल्यास चोवीस तास कमी पडतील. वृत्तपत्र व्यवसाय हा फायदेशीर नसतो, मात्र ध्येयाने प्रेरित समाजप्रबोधन होत असते. 1832 मध्ये पोर्तुगीज असताना मराठी वर्तमानपत्र जांभेकर यांनी सुरु केले होते. वृत्तपत्र लोकशाहीवर घाला घालणारे असल्याने आणीबाणीच्या काळात त्याचा बुलंद आवाज बंद करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. पत्रकार बनण्यास अनेक गोष्टींची नितांत गरज असते. त्यात शुद्ध भाषा, संक्षिप्त शब्द, स्पष्ट भाषा व परिश्रम घेण्याची मानसिकता असली पाहिजे. समाजाचे, देशाचे देणे लागतो, कर्तव्यभावनेने व्यवसाय ही भावना जपली पाहिजे.
हेही वाचाःधक्कादायक! गव्याच्या तोंडात प्लास्टिकची बाटली…

गोवन वार्ताचे संपादक पांडुरंग गांवकर…

प्रसारमाध्यमात हुशार व्यक्तींना स्थान असून त्यांनी तंत्रशुद्ध शिक्षण घेतल्यास उज्वल भविष्य आहे. गोव्यात 12 वर्तमानपत्रे असून त्या कार्यालयात कमीतकमी 50 कर्मचारी संख्या असते. त्यात संपादक, उपसंपादक तसेच क्रीडा, मनोरंजन, आर्थिक, पुरवणी संपादक व अलीकडे सॉफ्टवेअर अभियंता, इव्हेंट मॅनेजर, ग्राफिक्स डिझायनर, न्यूज रीडर, व्हॉईस ओव्हर तसेच मार्केटिंग, वितरण व अन्य विभागात कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. रिपोर्टर बनण्यासाठी समग्र माहिती, हुशारी व परिश्रम घेण्याची क्षमता दाखवावी लागते.पत्रकारिता क्षेत्रात विश्वासार्हता जपणे महत्वाचे असते. सोशल मीडियाचा अतिरेक वाढत असून, खोट्या बातम्या पसरवल्या जातात. अलीकडे मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयाने बेदम मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल झाले, प्रत्यक्षात ते बनावट असल्याचे वर्तमानपत्रांना सांगावे लागले हे लक्षात येईल. डिजिटल प्रकारात संक्षिप्त तर वर्तमानपत्रात विस्तृत माहिती मिळते व विद्यार्थ्यांनी रुची दाखविल्यास चांगले पत्रकार घडू शकतात, असे गोवन वार्ताचे संपादक गांवकर यांनी व्यक्त केले.
हेही वाचाःShocking: रिसॉर्टच्या स्वीमिंग पूलमध्ये बुडून ६ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू…

लोकशाही सुदृढ होण्यास पत्रकाराची महत्वाची भूमिका

प्रारंभी चेअरमन लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पत्रकारिता क्षेत्रांत प्रचंड बदल होत आहेत. लोकशाहीत चौथा स्तंभ जरी गणना होत असली तरी सद्यस्थितीत पहिला स्तंभ म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. लोकशाही सुदृढ होण्यास पत्रकार महत्वाची भूमिका बजावत आहेत. देशावर 150 वर्षे राज्य केलेल्या ब्रिटनमध्ये 75 वर्षांनंतर भारतीय ऋषि सूनक पंतप्रधानपदी बसतोय, ह्याचे अप्रुप आहे. त्यांची इंत्यंभूत माहिती प्रसारमाध्यमे वर्तमानपत्रांनी दिली.आम्हा सर्वांसाठी तो अभिमानास्पद क्षण आहे. गोव्याच्या पत्रकारितेत नाव कमावलेल्या चार नररत्नांच्या व्याखान्याने आजची कार्यशाळेचे आयोजन केल्याचे चेअरमन पार्सेकर यांनी सांगितले. यावेळी संस्थेतर्फे चेअरमन पार्सेकर यांच्या हस्ते चारही संपादकाना स्मृतिभेट देण्यात आली.

प्रारंभी विद्यार्थिनी युवराञी नाईक, ऍना डिसौझा, गौरव किंळेकर, खुशबू च्यारी यांनी सत्राचे निवेदन केले. कु. राही पडलोस्कर, प्रगती नाईक, सृष्टी शेटगांवकर, वेदा परब ह्यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर पल्लवी पाटील हिने आभार मानले.
हेही वाचाःअल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; स्वसंरक्षण प्रशिक्षकाला अटक…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!