चेंबरमधील पाण्यात बुडून एका कामगाराचा मृत्यू…

अचानकपणे विहिरीत पाणी भरू लागल्याने अडकला कामगार

Goan Varta Live | प्रतिनिधी

फोंडा : कवळे येथील मलनिस्सारण प्रकल्पाच्या चेंबरमध्ये साफसफाईचं काम करताना एका कामगाराचा मृत्यू झालाय. तर त्याच्यासोबत असणारा दुसरा कामगार बचावला. गुरुवारी रात्री हा धक्कादायक प्रकार घडलाय. याप्रकरणी फोंडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचाःगोवा : नोकऱ्यांसाठी अर्ज केलेल्या हजारो युवकांसाठी खूशखबर!…

इतरांनी मोठे परिश्रम करून काढलं बाहेर

मिळालेल्या माहितीनुसार मृताचं नाव शुभम गोपडे आहे. दाग परिसरातील कपिलेश्‍वरी-ढवळी येथील मलनि:स्सारण प्रकल्पाचं काम सुरू आहे. या ठिकाणी मलनि:स्सारण प्रकल्‍पाच्‍या वाहिन्या आणि विहिरी बांधण्यासाठी खोदकाम करण्‍यात येतंय. शुभम विहिरीतील पाण्यात अडकल्यानंतर त्याला इतरांनी मोठे परिश्रम करून बाहेर काढलं आणि फोंड्यातील आयडी उपजिल्हा इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र तेथील डॉक्‍टरांनी त्‍याला मृत घोषित केलं.
हेही वाचाःकन्नडिगांना निवडणूक लढवण्यास आरजीचा विरोध, ‘हे’ आहे कारण…

अचानकपणे पाणी भरल्यानं बाहेर पडणं कठीण बनलं

कपिलेश्‍वरी-ढवळी येथील तिठ्यावर असलेल्या एसटीपीच्या संप विहिरीत दोन कामगार उतरले होते. मात्र अचानकपणे या विहिरीत पाणी भरू लागलं. त्यामुळे एका कामगाराने कसंबसं विहिरीबाहेर येऊन आपला जीव वाचवला. पण दुसरा कामगार शुभम गोपडे हा या पाण्यात बुडाला. अचानकपणे पाणी भरल्यानं शुभमला या विहिरीच्या बाहेर पडणं कठीण बनलं. त्यामुळे त्याचा बुडून मृत्‍यू झाला. शुभम हा परप्रांतीय असून तो सध्या फोंड्यात राहत होता. या प्रकरणी फोंडा पोलिस पुढील तपास करतायत.
हेही वाचाःपरप्रांतिय महिलेचा गोव्यात खून ; मात्र पती…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!