फातोर्डातील एका वेटरचा मृत्यू…

मडगाव आरोग्य विभागाकडून याला दुजोरा नाही

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव : मडगाव व फातोर्डा परिसरात तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. फातोर्डा परिसरातील नगरसेवक कामिलो बर्रेटो यांनी प्रभागातील एका हॉटेलमध्ये कार्यरत वेटरचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याचे सांगितले. परंतु, मडगाव आरोग्य विभागाकडून याला दुजोरा मिळू शकलेला नाही.
हेही वाचा:Crime | पर्रात घर फोडून पळवला ऐवज…

मडगाव व फातोर्डा परिसरात डेंग्यूचे रुग्ण

फातोर्डा परिसरातील स्थानिक नगरसेवक कामिलो बर्रेटो यांनी त्यांच्या प्रभागातील एका हॉटेलमध्ये काम करणार्‍या वेटरला ताप येत होता व त्याच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात उपचार सुरू असताना मृत्यू झाला असल्याचे सांगतानाच सदर आजारी वेटरचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याचे म्हटले. तसेच मडगाव व फातोर्डा परिसरात डेंग्यूचे रुग्ण आढळत असल्याचेही सांगितले.
हेही वाचा:एकाच रात्रीत तीन ठिकाणी चोरट्यांचा ‘धुमाकूळ’…

फातोर्डा परिसरातील वेटरचा डेंग्यूमुळे मृत्यू

सदर रुग्णाचा मृत्यू डेंग्यूमुळे झाल्याबाबत विचारणा करण्यासाठी मडगाव आरोग्य केंद्राचे अधिकारी क्वाद्रोस सोकारो यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन न उचलल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे फातोर्डा परिसरातील वेटरचा मृत्यू डेंग्यूने झाल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळू शकलेला नाही. असे असले तरी सध्या मडगाव परिसरात डेंग्यू व चिकनगुनियाचे रुग्ण आढळत असून सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन स्थानिक नागरिकांकडूनच समाजमाध्यमांवर केले जात आहे.
हेही वाचा:Mirzapur 3 | ‘मिर्झापूर ३’ लवकरच चाहत्यांच्या भेटीला…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!