म्हापसा येथील सामाजिक कार्यकर्ते सलमान खान यांचा ‘आप’ प्रवेश

गोवा राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांच्या उपस्थितीत केला पक्ष प्रवेश

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः म्हापशातील सामाजिक कार्यकर्ते आणि सलमान खान यांनी आज ‘आप’मध्ये प्रवेश केला. खान गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रीय समाज पक्षाचे उत्तर गोवा प्रमुख होते. कचरा व्यवस्थापनावर काम करण्याबरोबरच म्हापसा तार नदी वाचवण्याच्या प्रयत्नासाठी खान गोव्यात प्रसिद्ध आहे. लॉकडाऊन दरम्यान खानने गरीब लोकांना आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना फूड पॅक पुरवण्याचे देखील काम केले.

गोवा राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

सलमान खान हे आपचे गोवा राज्य संयोजक राहुल म्हांबरे आणि पक्षाचे नेते सुनील सिग्नपूरकर यांच्या उपस्थितीत पक्षात सामील झाले. स्थानिक आमदार आणि भाजप सरकारच्या नेतृत्वाखाली गेल्या 20 वर्षांपासून कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही. बाजाराची परिस्थिती, खराब रस्ते आणि पार्किंगची परिस्थिती या मुद्द्यांकडे स्थानिक आमदार आणि भाजप सरकारने दुर्लक्ष केलं आहे. भाजप सरकार म्हपसाचा विकास करण्यात पूर्ण अपयशी ठरलं आहे आणि म्हणूनच सलमान आणि त्यांची टीम अशा अनेक समस्यांनावर सक्रियपणे काम करत आहेत.

म्हापसा समस्या मुक्त करणे

पक्षात सामील होण्याचा माझा एकमेव हेतू म्हपसाच्या समस्येवर काम करण्यासाठी आहे यासाठी एक चांगलं व्यासपीठ मिळवणं आणि म्हापसामध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या समस्यांना हाताळणं आहे. पुढील 100 वर्षे डोळ्यासमोर ठेवून म्हपसाचा विकास करावा लागेल! आम्ही अजूनही खंडीत वीजपुरवठ्याने का ग्रस्त आहोत? आमच्या सरकारी शाळा वाईट स्थितीत का आहेत? असे प्रश्न उपस्थित करून जर अरविंद केजरीवाल दिल्लीत सुशासन देऊ शकतात ते गोव्यात का शक्य होणार नाही, असं खान म्हणाले

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!