Panchayat Result | सत्तरीत प्रस्थापितांना धक्के…

मतमोजणीची प्रक्रिया वाळपईच्या कदंब बस स्थानकावर

Goan Varta Live | प्रतिनिधी

वाळपई : सत्तरीतील १२ ग्रामपंचायतीमधील अनेक प्रस्थापितांना धक्के बसले आहेत. अनेक माजी सरपंच व पंचांना मतदारांनी नाकारले, तर अनेक नवख्या उमेदवारांना मतदारांनी संधी दिलेली आहे. मतमोजणीची प्रक्रिया वाळपईच्या कदंब बस स्थानकावर घेण्यात आली होती. मात्र, सदर ठिकाणी बसण्याची व्यवस्था नसल्यामुळे समर्थकांना अक्षरशा पावसात भिजत ताटकळत उभे राहावे लागले.
हेही वाचा:मये, साखळीत भाजप समर्थक, डिचोलीत डॉ. शेट्ये गटाचे वर्चस्व…

पंचायत आणि विजेते पंच पुढीलप्रमाणे

पिसुर्ले : प्रभाग १. बिजली गावडे, २. सुवर्णा शिलकर, ३. देवानंद परब, ४. आत्माराम परब, ५. राजश्री जलमी (बिनविरोध), ६. रुपेश गावडे, ७. नामदेव च्यारी.

होंडा : १. शिवदास माडकर, २. निलिमा शेट्ये, ३. प्रमोद गावडे, ४. दीपक गावकर, ५. सुशांत राणे, ६. सुमेधा मांडकर (बिनविरोध), ७. निलेश सातार्डेकर, ८. कृष्णा गावकर, ९. स्मिता माटे, १०. सिया बाडके, ११. रेश्मा गावकर.

खोतोडा पंचायत : १. नंदिनी म्हाळशेकर, २. प्रशिला गावकर, ३. प्रतिमा वंडेकर, ४. नामदेव राणे, ५. राजाराम परिवार, ६. सलोनी गावकर, ७. रोहिदास गावकर.

पर्ये : १. हेमंत राणे सरदेसाई, २. विद्दीशा गोसावी, ३. दत्ता राणे, ४. दीपा नाईक, ५ उमेश राणे, ६. अमिषा गावकर, ७. आत्माराम शेट्ये, ८. लक्ष्मीकांत शिरोडकर, ९. रती गावकर.

गुळेली : १ अ​क्षिता गावडे (बिनविरोध), २. ज्योती गावकर, ३. सिध्दू गावकर, ४. सुरज नाईक, ५ नितेश गावडे (बिनविरोध), ६. रत्नाकर कासकर, ७. प्रशांती मेळेकर.

भिरोंडा : १. मनिषा म्हादी पिळ्येकर (बिनविरोध), २. बाबुराव गावडे, ३. किरण गावडे, ४. उदयसिंग राणे (बिनविरोध), ५. विदेश नाईक, ६. रुपाली गावकर, ७. रंजना राणे.

ठाणे -डोंगुर्ली : १. निलेश परवार (बिनविरोध), २. तनया गावकर, ३. सुरेश आयकर, ४. सरिता गावकर (बिनविरोध), ५. विनायक गावस, ६. अनुष्का गावस, ७. सुभाष गावडे (बिनविरोध), ८. संचिथा गावक, ९. सोनिया गावकर.

सावर्डे पंचायत : १. नितेंद्र राणे, २. शिवा कुडशेकर, ३. शिवाजी देसाई (बिनविरोध), ४. बुधाजी म्हाळशेकर, ५. उज्वला गावकर, ६. अक्षता गावकर, ७. यशोदा गावडे.

नगरगाव : १. चंद्रकांत मानकर, २. रामू खरवत, ३. मामू खरवत, ४. राजेंद्र अभ्यंकर, ५. देवयानी गावकर, ६. संध्या खाडीलकर, ७. उर्मिला गावस.

केरी : १. नंदिता गावस, २. संदिप ताटे, ३. श्रीपाद गावस, ४. राजेश गावस, ५. तन्वीर पागंम, ६. दिक्षा गावस. ७. उस्मान सय्यद, ८. भीवा गावस, ९. सुप्रिया गावस.

म्हाऊस : १. सयाजी सावंत, २. राधिका सावंत, ३. कांता गावस, ४. गुरुदास गावस, ५. सुलभा देसाई, ६ प्रिती गावकर, ७. सोमनाथ काळे (बिनविरोध).

मोर्ले : १. रुचिता माईंणकर, २. रुपेश मळीक, ३. भाग्यश्री गावकर, ४. अमित शिरोडकर, ५. शोभा गावस, ६. रंजना गावस, ७ मसो तानोडी,

पर्ये पंचायतीमध्ये चिट्ठी टाकून निकाल

पर्ये च्या प्रभाग ९ मधील उमेदवार रती गावकर व महेश गावकर यांना १३२ अशी समान मते पडली. यामुळे, पुन्हा एकदा फेरमतमोजणी घेण्यात आली. या मतमोजणीतही मते समान झाल्याने चिठ्ठी टाकून निकाल जाहीर करण्यात आला. यात रती गावकर यांचा विजय झाला. यामुळे जवळपास तीन तास समर्थकांची तारांबळ उडाली होती.

केरीत केवळ एका मताने विजय

केरीतील प्रभाग ३ मध्ये श्रीपाद गावस यांचा एक मताने विजयी झाला. मतमोजणीनंतर एका मताने विजय झाल्याचे विजय झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, पुन्हा एकदा मतमोजणी घेण्यात आली. या मतमोजणी नंतरही श्रीपाद गावस एका मताने विजय झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांना विजयी घोषित करण्यात आले. 

   

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!