बापरे! फेरीतून पडून एकाचा मांडवी नदीत बुडून मृत्यू

सारमानस फेरीतून पडून दुर्दैवी अंत

विनायक सामंत | प्रतिनिधी

डिचोली : शनिवारी एक विचित्र घटना घडली. सारमानस फेरी बोटीतून एक माणूस पडल्याचं समोर आलं. त्यानंतर या माणसाचा अग्निशमनच्या जवानांकडून लगेचच शोध सुरु करण्यात आला. अखेर या माणसाचा मांडवी नदीत बुडून मृत्यू झाल्याचं समोर आलंय.

नेमकं काय घडलं?

सारमानस फेरीतून येत असताना एका इसमाचा तोल गेला आणि तो मांडवी नदीत बुडल्याची भीती व्यक्त केली जात होती. याची माहिती तत्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर डिचोली अग्निशमन दलाच्या जवानांनी शोध सुरू केला आहे. शनिवारी संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत या इसमाचा शोध सुरु होता. पण त्याचा पत्ता लागू शकला नव्हता.

हेही वाचा – लपून मुलींचे फोटो काढणारा युवक अखेर गजाआड

अखेर मृतदेह हाती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. ७० वर्षीय नामदेव फडते हे अडकोण बाणस्तारी येथील सारमानस फेरीतून येत होते. त्यांच्यासोबत एक इसमही होता. सारमानस फेरी धक्क्याजवळ पोचत असतानाच नामदेव फडते हे पाण्यात पडले.

हेही वाचा – Siddhi Naik Case | Follow Up | Crime | पोलिसांसमोरचं आव्हान कायम, तपास अजूनही सुरु

त्यानंतर त्यांचा फेरीत शोध घेण्यात आला. पण ते दिसले नाहीत. अखेर ते पाण्यात पडल्याचं लक्षात आल्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. अखेर त्यांचा मृतदेह हाती लागलाय. दरम्यान, नेमक्या कोणत्या कारणामुळे ते फेरीतून पाण्यात पडले, हे कळू शकलेलं नाही. मात्र या दुर्दैवी घटनेत या ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झालाय.

हेही वाचा – रेती व्यानसायिकाच्या हत्येचा अखेर छडा

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!