पोलीस असल्याचे भासवून लुटणाऱ्याला कोठडी

गुन्हा शाखेची कारवाई : पोलीस खात्यातील संशयित कर्मचारी बडतर्फ

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : पोलीस खात्यातील एका बडतर्फ कर्मचाऱ्याने निवृत्त पोलीस अधिकारी महेश गावकर यांच्या नावे फोन करून दिल्लीतील बांधकाम व्यावसायिकाला १ लाखाचा गंडा घातला. या प्रकरणी गुन्हा शाखेच्या पथकाने शनिवारी अंधेरी – मुंबई येथून संशयित सूरज पेंडसे (२६, रा. आसगाव-बार्देश) याच्या मुसक्या आवळल्या. 

हेही वाचा:शिवसेना बंडखोरांची मने वळविण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादीच्या दोघांना अटक…

१ लाख रुपयांनी प्रकल्पाला ‘ना हरकत’ दाखला                

दिल्लीतील बांधकाम व्यावसायिक गगनदीप सिंग सहगल यांच्या तक्रारीनुसार, पर्रा येथे त्यांचा निवासी प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाच्या शेजारील जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार कोणीतरी पंचायतीकडे केली होती. याची माहिती ७८२२८३५३५७ या क्रमांकाचा मोबाईल वापरणाऱ्याला मिळाली होती. त्याने व्यावसायिकाशी संपर्क साधून, आपण गुन्हा शाखेचे पोलीस अधीक्षक महेश गावकर बोलतोय, असे सांगून संभाषण केले. ‘तुमच्या प्रकल्पाविषयी गुन्हा शाखेकडे तक्रार आली आहे. यावरून हा प्रकल्प बंद करून तुम्हाला अटक केली जाईल. ही कारवाई टाळण्यासाठी १ लाख रुपये द्या. त्यानंतर प्रकल्पाला ‘ना हरकत’ दाखला मिळेल. यासंदर्भात आमचा कर्मचारी तुमच्याशी संपर्क साधेल’, असे त्याने फोनवरून सांगितले.

हेही वाचा:सत्तरीतील सरपंच, पंच धास्तावले, ‘हे’ आहे कारण…

फसवणुकीचा संशय आल्याने पोलिसांत तक्रार दिली.

२२ जून रोजी दुपारी १२.३० वाजता ८५९१७९४७४९ या क्रमांकाच्या मोबाईलवरून व्यावसायिकाला अज्ञाताने संपर्क करून वागातोर-हणजूण येथे पैसे घेऊन येण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे पैसे घेण्यासाठी दोन व्यक्ती तेथे आल्या होत्या. ‘ना हरकत’ दाखल्यासाठी व्यावसायिकाने वरील क्रमांकावर संपर्क साधला असता, प्रतिसाद मिळाला नाही. फसवणुकीचा संशय आल्याने त्यांनी तक्रार दिली.

हेही वाचा:उपनगराध्यक्षांना हटवण्याच्या हालचाली, वाचा सविस्तर…

संशयिताला गोव्यात आणून अटक केली

या तक्रारीची दखल घेऊन अधीक्षक निधीन वालसन यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नारायण चिमुलकर यांनी तपास सुरू केला. संशयित महाराष्ट्रात असून तो पोलीस सेवेतून बडतर्फ केलेला कर्मचारी सूरज पेंडसेच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार निरीक्षक चिमुलकर, हवालदार अशोक गावडे, काॅन्स्टेबल हेमंत गावकर, ईश्वर कासकर व इतर २७ जून रोजी महाराष्ट्रात गेले. या पथकाने शनिवारी अंधेरी-मुंबई येथून संशयित पेंडसे याच्या मुसक्या आवळल्या. रविवारी संशयिताला गोव्यात आणून अटक केली. संशयिताला म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

हेही वाचा:सेवेत घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, सरकारला इशारा…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!