आमच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या…

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्टः गोव्याचे खासदार तथा केंद्रीय आयूषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला सोमवारी रात्री अपघात झाला. या अपघातात त्यांच्या पत्नी आणि सचिव यांचा मृत्यू झालाय. उत्तर कर्नाटकात यल्लापूरहून अंकोला येथे प्रवास करताना हा अपघात घडला. दोन दिवस त्यांच्या पत्नीसोबत कर्नाटकातील देव दर्शन करण्यासाठी ते प्रवास करत होते. या अपघातानंतर कर्नाटक विधिमंडळ सदस्य शांताराम सिद्दी यांची एक पोस्ट समोर आलीये.
शांताराम सिद्दी यांची पोस्ट
श्रीपाद नाईक यांच्या अपघातानंतर कर्नाटक विधिमंडळ सदस्य शांताराम सिद्दी यांनी पोस्ट केलीये. त्या पोस्टमध्ये ते म्हणालेत, आज दिवसभरात श्रीपाद नाईक यांनी सत्कार कार्यक्रमात भाग घेतला. आमच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. विविध विषयांवर चर्चा केली. नंतर देवीचे दर्शन घेतलं. मग ते गोकर्णला जायला निघाले होते. होते. हा अपघात घडलाय यावर खरं तर विश्वास बसत नाहीये. काही वेळा पूर्वी आम्ही त्यांना हसतमुख पाहिलेलं. आणि अचानक असं झाल्यानं विश्वास ठेवणं कठीण जातंय.
श्रीपाद नाईकांचा कर्नाटकात गौरव
सोमवारी सकाळी श्रीपाद नाईकांचा कर्नाटकात गौरव करण्यात आला होता. कर्नाटकाचे कामगार मंत्री शिवराम हेब्बर आणि येल्लापूरचे खासदार यांनी श्रीपाद नाईकांचा सत्कार केलेला. कर्नाटक विधिमंडळ सदस्य शांताराम सिद्दी यांचीदेखील आयुश मंत्र्यांसोबत बैठक झाली होती.
श्रीपाद नाईक यांच्या पत्नी विजया नाईक यांच्या अपघातील मृत्यूबद्दल कर्नाटकातून शोक व्यक्त केला जातोय. कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी म्हटलंय, श्रीपाद नाईकांचा हा अपघात सगळ्यांसाठीच दुःखद घटना आहे. या अपघातात त्यांनी आपल्या पत्नीला गमावलंय. आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत.