अनैतिक संबंधातून अल्पवयीन मुलगी बनली कुमारीमाता…

प्रसुतीनंतर गर्भकाचा मृत्यू : पणजी पोलिसांत गुन्हा दाखल

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा : एक १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी अनैतिक संबंधातून कुमारीमाता बनल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रसूतीनंतर या मुलीचे बाळ वारले. बेळगाव पोलिसांकडून आलेल्या हस्तांतरितप्रकरणी पणजी पोलिसांनी संतोष नामक युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा:वेळसांवमध्ये ‘गोंयकारांचो एकवोट’; चिखली, बोगमाळोत माविन समर्थक…

बेळगाव जिल्ह्यातून ऊस कामगारांसमवेत पळून गोव्यात

पीडित १२ वर्षीय मुलगी बेळगाव जिल्ह्यातील असून तिला एकूण १२ भावंडे आहेत. आई वडिलांच्या रोजच्या जाचामुळे जून २०२१ मध्ये ती ऊस कामगारांसमवेत पळून गोव्यात आली होती. ती इतर काही परप्रांतीय कामगारांसमवेत पणजी बसस्थानक आवारातच राहत होती. तेथे तिची संतोष नामक संशयिताशी ओळख झाली. काही महिन्यांनी ती दोघेही महाराष्ट्रात राहायला गेली तेथे त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. भांडणानंतर पीडितेने आपल्या नातेवाईकाला बोलावून घेतले व ती त्यांच्यासमवेत आपल्या घरी गेली. तेव्हा ती गरोदर होती. त्यानंतर ८ जुलै २०२२ रोजी तिची बेळगावमधील एका इस्पितळात प्रसूती झाली. पण २० दिवसांनी २८ जुलै रोजी तिच्या बाळाचे निधन झाले.
हेही वाचा:गावाचा विकास हाच एकमेव ध्यास…

लैंगिक अत्याचार पणजी बसस्थानकाच्या आवारात

त्यानंतर इस्पितळाकडून हा प्रकार बेळगाव एपीएमसी पोलीस स्थानकाला कळविण्यात आला. पीडितेवर लैंगिक अत्याचार पणजी बसस्थानकाच्या आवारात घडल्याचे चौकशीवेळी स्पष्ट झाले. त्यानुसार बेळगाव पोलिसांनी हे प्रकरण शून्य कलमाखाली नोंदविले आणि नंतर शहर पोलीस आयुक्तांमार्फत गोवा पोलिसांकडे वर्ग केले. पणजी पोलिसांनी या प्रकरणी भा.द.सं. मया ३७६ (१) (२) (एन) व पॉक्सो कायदा कलम ४ व ६ आणि गोवा बालकायदा कलम ८ (२) खाली गुन्हा नोंद केला आहे. संशयिताचा शोध घेणे कठीण बनले असून पुढील तपास पणजी पोलीस करत आहेत.
हेही वाचा:फोंडा तालुक्यातील पंचायत ​निवडणुकीत धक्कादायक निकाल…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!