अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी होंडात परप्रांतीय तरुणाला अटक

मोहम्मद सर्फराज उर्फ राज (२४, रा. झारखंड) याला अटक

Goan Varta Live | प्रतिनिधी

वाळपई : होंडा-सत्तरी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी वाळपई पोलिसांनी मोहम्मद सर्फराज उर्फ राज (२४, रा. झारखंड) याला अटक केली आहे. त्यामुळे होंडा भागात खळबळ निर्माण झाली आहे.

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सातत्याने बळजबरी

वाळपई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सातत्याने बळजबरी करीत होता. सदर प्रकार तीन दिवसांपूर्वी उघडकीस आला. अल्पवयीन मुलीने याबाबतची माहिती आपल्या पालकांना दिल्यानंतर वाळपई पोलीस स्थानावर तक्रार दाखल करण्यात आली. याची गंभीर दखल घेऊन वाळपई पोलिसांनी मोहम्मद सर्फराज या झारखंड राज्यातील तरुणाला अटक केली आहे.

हेही वाचाः१० नंतरच्या पार्ट्यांबाबत सोमवारी बैठक : देविदास पांगम

वेगवेगळ्या प्रकारचे आमिषे दाखवून बळजबरी

अधिक माहितीनुसार सदर युवक हा अल्पवयीन मुलीच्या घराशेजारीच राहत होता. तो रोजंदारीवर कामाला जात होता. मात्र, सदर अल्पवयीन मुलीला वेगवेगळ्या प्रकारचे आमिषे दाखवून तिच्यावर बळजबरी करीत होता. याविषयीची माहिती सदर अल्पवयीन मुलीने आपल्या कुटुंबाला दिल्यानंतर त्याच्यावर वाळपई पोलीस स्थानकावर गुन्हा दाखल करण्यात आला व त्याला अटक करण्यात आली.

चौकशीसाठी रिमांड

दरम्यान, संशयिताला वाळपई प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर उभे केले असता त्याला चौकशीसाठी रिमांड देण्यात आलेला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रज्योत फडते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सर्वेश गड्डी पुढील तपास करीत आहेत.

परप्रांतीयांच्या संख्येत वाढ

या भागात परप्रांतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. काही वर्षांपूर्वी परप्रांतीयांच्या विरोधात स्थानिकांनी उठाव केला होता. तेव्हापासून त्यांच्यावर नियंत्रण आले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून परप्रांतीयांची संख्या बेसुमारपणे वाढू लागली असून या भागामध्ये सातत्याने चोऱ्यांचे प्रकारही सुरू झाले आहेत. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला असून पोलीस यंत्रणेने परप्रांतीयांची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 

हेही वाचाःनव्या समितीवर काँग्रेस नेत्यांकडूनच प्रश्नचिन्ह!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!