मोरजी येथे हॉटेल कर्मचाऱ्याचा समुद्रात बुडून मृत्यू…

मकबूल माळगीमनी | प्रतिनिधी
पेडणे : मोरजी येथे समुद्रात एका हॉटेलचा कर्मचारी बुडाल्याची घटना घडली आहे. मोरजी-तेमवाडो येथे शनिवारी सकाळी समुद्रात त्या कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आला. कमल आर्या (वय-३०) असे मयत हॉटेलच्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पेडणे पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
हेही वाचाःवाळू उपशाचा मार्ग मोकळा…
क्लबमधील पार्टीत मयत सहभागी
याबाबत अधिक माहिती अशी की, मोरजी येथे एका हॉटेलमध्ये कमल आर्या (वय-३०) हा युवक कामाला होता. शुक्रवारी रात्री आश्वे-पेडणे येथे झालेल्या एका क्लबमधील पार्टीत मयत सहभागी झाला होता. दरम्यान, मद्यधुंद अवस्थेत तो समुद्रात गेल्याने बुडाल्याचा पोलीसांनी संशय व्यक्त केला आहे. मोरजी-तेमवाडो येथे शनिवारी सकाळी समुद्रात त्या कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आला.
हेही वाचाःGoa Crime | रिसॉर्टमधील रूमबॉयनीच केला रशियन तरुणीवर बलात्कार…
मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी गोमेकॉत
पेडणे पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेउन उत्तरिय तपासणीसाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात पाठवला आहे. पेडणे पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्ताराम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक सुमेधा नाईक पुढील तपास करत आहेत.
हेही वाचाःमांद्रे किनाऱ्यावरील नाईट क्लब व्यावसायिकांचे धाबे दणाणले