अखिल गोवा दलित महासंघाकडून अनुराधा परवार यांना मदतीचा हात

पदाधिकाऱ्यांचं गोंयकारांना मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन

Goan Varta Live | प्रतिनिधी

वाळपईः मागच्या आठवड्यात राज्यात मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे नदीच्या पाण्यामध्ये वाढ झाल्याने पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. अनेक गावाचे रस्ते पाण्याखाली गेले. तसंच जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं. दरम्यान पिसुर्ले याठिकाणी एक हरिजन महिला अनुराधा अंकुश परवार हिचं घर कोसळल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तिच्यावर बेघर होण्याची वेळ आली. तिचं मोडून पडलेलं घरकुल पुन्हा उभारण्यासाठी अखिल गोवा दलित महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी हिच्या निवासस्थानी भेट देऊन तिला महासंघाच्यावतीने रोख रक्कम देऊन आर्थिक मदतीचा हात दिला. तसंच अनुराधा परवार यांना यथाशक्ती मदत करण्याचं गोंयकारांना आवाहन केलंय.

हेही वाचाः श्रीमती कमलाबाई हेदे विद्यालयाचा निकाल 100 टक्के

महासंघाच्या कार्यकर्त्यांनी लावली उपस्थिती

महासंघातर्फे महासंघाचे अध्यक्ष कृष्णा चोपडेकर, दीना निरावडेकर, पूनाजी पार्सेकर, कमलाकर परवार, यशवंत पार्सेकर तसंच इतरांनी यावेळी अनुराधा परवार यांच्या घरी उपस्थिती लावली. तसंच तिचं मोडून पडलेलं घर लवकरच उभं राहिल असा विश्वास तिला दिला.

हेही वाचाः यशवंत-कीर्तिवंत विद्यार्थ्यांचा आदर्श घ्या

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, गोवाने दिलाय मदतीचा हात

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे गोवा प्रदेश अध्यक्ष आयु. सतीश कोरगावकर, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितीचे अध्यक्ष आयु. सखाराम कोरगावकर, समितीचे कोषाध्यक्ष आयु. अशोक परवार यांनी काही दिवसांपूर्वी अनुराधा परवार हिच्या पडलेल्या घराच्या ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसंच विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर समिती गोवातर्फे आर्थिक मदतही केली. एवढंच नव्हे तर तिचं जमीनदोस्त झालेलं घर दुरुस्त करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची आणि सरकारी मदत मिळवून देणारा असं सांगून तिला धीर दिला.

हेही वाचाः ‘द सपोर्ट ग्रुप फॉर कोविड वॉरियर्स इन गोवा’ ट्रस्टतर्फे कोविड योद्ध्यांसाठी ८ रुग्णवाहिका

राहतं घर कोसळल्याने निवाऱ्याचा प्रश्न

अनुराधा अंकुश परवार यांच्या पतीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं आहे. इयत्ता पाचवीत शिकणारी त्यांची एक मुलगी आहे. घरात कामावणारा पुरुष नसल्यानं त्यांची आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे. त्यांच्या डोक्यावरचं छप्परच कोसळल्याने त्यांच्या समोर मोठा प्रश्न उभा राहिलाय. सध्या त्यांनी शेजारच्या घरी आश्रय घेतला आहे. यावेळी त्यांना मदतीची गरज असून सर्वानी तिला यथाशक्ती मदत करावी, अशी विनंती आयु. सतीश कोरगावकर, आयु. सखाराम कोरगावकर, आणि आयु. अशोक परवार यांनी केली आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | Politics | CM at Delhi | हायकमांडने मुख्यमंत्र्यांना काय मंत्र दिला?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!