पेडण्यातील शेतकऱ्यांना प्रवीण आर्लेकरकडून मदतीचा हात

मकबूल | प्रतिनिधी
पेडणेः तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याचं सरकारने जाहीर केलं आहे. परंतु अजूनही अनेक शेतकरी भरपाईपासून वंचित आहेत. पेडणेतील हळर्ण, कूटवळ, इब्रामपूर या गावातील अशाच वंचित शेताकऱ्यांना मगोप नेते प्रवीण आर्लेकरांनी मदतीचा हात दिला आहे. त्यांनी शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम केलं आहे.
केवळ आर्लेकरांनी आमची भेट घेतली
आम्हा शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालंय. काही जणांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. यामुळे शेतकरी पूर्णपणे निराश झालेत. अशा वेळी स्थानिक प्रतिनिधींनी लोकांची भेट घेऊन त्यांची व्यथा जाणून घेतली पाहिजे. मात्र इथे कुणी मंत्री, आमदार, अधिकारी येऊन गेले नाहीत. ना कुणी येऊन दिलास्याचे शब्द दिले. केवळ प्रवीण आर्लेकरांनी शेतकऱ्यांची भेट घेतली, नुकासग्रस्त भागाची पाहणी केली. तसंच आर्थिक मदतही केली. आर्लेकरांनी आमच्यासाठी जे काही केलं ते खूप आहे, असं स्थानिक लोक व्यक्त होताना म्हणाले.

फूल ना फुलाची पाकळी देऊच शकतो
एका बाजूने कोरोना आणि दुसऱ्या बाजून तौक्ते वादळाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय. मी या शेतकऱ्यांची जास्त मदत करू शकत नाही. मात्र फूल ना फुलाची पाकळी तरी देऊच शकतो. मला जर लोकांनी सहकार्य केलं, तर यापुढे ही अशी परीस्थित निर्माण होऊ देणार नाही, असं आर्लेकर म्हणाले.

54 शेतकऱ्यांना मदत
पेडणे भागातील हळर्ण, कूटवळ, इब्रामपूर या गावातील एकूण ५४ शेतकऱ्यांना आर्लेकरांनी मदत केली. तसंच यापुढे कोणती मदत लागल्यास मला हक्काने सांगा, असंही आर्लेकर म्हणाले.
