सगुण कदम यांना प्रवीण आर्लेकरांकडून मदतीचा हात

झोपडी दुरुस्त करण्यासाठी केली आर्थिक मदत

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः खासदार तथा आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी इब्रामपूर गाव हा संसद ग्रामसाठी आदर्श ग्राम म्हणून निवड केली होती.  मोठा गाजावाजा झाला, आतापर्यंत आदर्श ग्राम झाला असेल तर सर्व समस्या सुटायला हव्या होत्या. याच मतदारसंघाचे लोकप्रतीनिधीत्व उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर करत आहे. आणि याच आदर्श गावात दलित वस्तीतील सगुण कदम या कुटुंबाला, ना घर, ना पाणी, ना वीज मिळालीये.  त्यांच्या मदतीला मगोचे नेते प्रवीण आर्लेकर धावून आलेत. आर्लेकरांनी सगुण कदम यांच्या झोपडीला आसरा दिल्याने झोपडीला पत्रे चढले. मागच्या महिन्यात मतदारसंघाचा दौरा करताना, नागरिकांच्या समस्या ऐकून घेताना सगुण कदम यांची समस्या मगोचे प्रवीण आर्लेकर यांनी ऐकून घेतली आणि त्यांना आधार दिला. पेडणेतील राखीव असलेल्या मतदारासंघातील इब्रामपूर येथील सगुण कदम अजूनही हलाखीचे जीवन जगत होते.  झोपडीतच राहत होते. ते मुलभूत गरजांपासून वंचित होते.

हेही वाचाः 67 मृत्यूंची माहिती लपवलेल्या प्रकाराची चौकशी करा

दोष कुणाला द्यायचा?

गोवा राज्याचं हिरकमहोत्सवी वर्षात पदार्पण होत असतानाच अजूनही  दुसऱ्या बाजूने रखीवता असलेल्या सध्याचा पेडणे मतदारसंघातील इब्रामपूर गावात अजूनही सगुण कदम या व्यक्तीला घर, नळ आणि वीज मिळालेली नाही. हे कुणाला सांगितलं तर खरं वाटणार नाही.  मात्र ही सत्यस्थिती आहे. गोवा मुक्त होऊन आज ६० वर्षं उलटली तरी गोव्यात दारिद्र्य रेषेखाल असलेली काही कुटुंब भेटतात. त्यावेळी कुणाला दोष द्यायचा असा प्रश्न उभा राहतो. पेडणे तालुक्यातील इब्रामपूर गाव हा गोव्याचे उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक यांनी आदर्श गावा म्हणून दत्तक घेतला होता. अशा गावात जेव्हा दारिद्र्य रेषेखाल कुटुंब दिसतात, तेव्हा मात्र सरकारच्या विकासाच्या बाता फोल ठरतात आणि लोकप्रतिनिधी कमी पडल्याचं दिसतं.

मंत्र्याच्या भाषणाचा अर्थ नेमका काय होतो?

पेडणे तालुक्यातील इब्रामपूर गाव हा अगोदरचा धारगळ मतदारसंघातील आणि आताचा पेडणे मतदारसंघातील गाव आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. पेडणे मतदारसंघाचं नेतृत्व राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर करतात. ते आपल्या भाषणात जनतेचे सेवक, नोकर असल्याचं सांगतात. मात्र त्यांच्यात मतदारसंघात सगुण कदम सारखा व्यक्ती अजूनही झोपडीत राहतात. अशावेळी मंत्र्याच्या भाषणाचा अर्थ नेमका काय होतो?

हेही वाचाः सुनील छेत्रीने मोडला लिओनेल मेस्सीचा रेकॉर्ड

आर्लेकरांनी दिला मदतीचा हात

आर्लेकरांनी नुकतीच वादळाच्या तडाख्यात नुकसान झालेल्या इब्रामपूर गावाला भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यावेळी इब्रामपूर गावात त्यांची भेट सगुण कदमशी झाली. त्याची परिस्थिती त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. आर्लेकरांनी सगुण कदमच्या झोपडीला भेट दिली आणि ती झोपडी दुरूस्त करण्यासाठी आर्थिक मदत केली. तसंच आपल्या कार्यकर्त्यांना त्याची झोपडी व्यवस्थित करून पत्रे घालून, ती व्यवस्थित बांधून देण्यास सांगितलं.

हेही वाचाः समाजमाध्यमावर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या ‘त्या’ संशयिताला अटक

दिलेला शब्द मी पाळतो

इब्रामपूर भागाचे आमदार आणि राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर वीस वर्षांत चार वेळा या मतदारसंघातून निवडून येतात आणि याच मतदारसंघात सगुण कदम सारखी व्यक्ती त्यांना दिसत नाही हे मोठं आश्चर्य आहे. जी व्यक्ती अनुसूचित जातीची आहे, गरीब आहे, जिला आधार नाही आणि त्या व्यक्तीचा विकास व्हावा यासाठी आजगावकरांनी काहीच प्रयत्न केलेले नाही. मग वीस वर्षांत आजगावकरांनी नक्की कुणाचा विकास केला? असा प्रश्न पडतो. मी जनतेचा नोकर, सेवक असं फक्त म्हणून चालत नाही, तर तसं काम करावं लागतं. आजगावकरांनी केवळ या मतदारसंघात राजकारण केलं, समाजकल्याण करायला ते विसरले. समाजकारण केलं असतं तर त्यांना सगुण कदम सारखी व्यक्ती दिसली असती, असा टोला आर्लेकरांनी लगावलाय. मी दिलेला शब्द पाळतो, असंही आर्लेकरांनी पुढे म्हटलंय.

हेही वाचाः 67 मृत्यूंची माहिती लपवलेल्या प्रकाराची चौकशी करा

आर्लेकरांचे आभार

झोपडी दुरुस्त करण्यासाठी मदत केल्याबद्दल सगुण कदम यांनी आर्लेकरांचे आभार मानले. आजपर्यंत आम्हाला कुणीच मदत केली नव्हती, मात्र प्रवीण आर्लेकरांनी मदत करून आधार दिला. नाहीतर या पावसाळ्यात जगणं कठीण झालं असतं, असं कदम म्हणाले.

हेही वाचाः जीसीझेडएमपीसाठीची फेर जनसुनावणी आता 8 जुलै रोजी

लोकप्रतिनिधी असा असावा

यावेळी मोपा उपसरपंच सुबोध महाले, माजी सरपंच चंद्रशेखर खडपकर आदी उपस्थित होते. आर्लेकरांनी जे आश्वासन कदमांना दिलं, ते पूर्ण केलं. इथल्या लोकप्रतिनिधीला जे करणं जमलं नाही ते आर्लेकरांनी केलं. लोकप्रतिनिधी असा असावा लागतो, असं मोपा उपसरपंच सुबोध महाले यांनी बोलताना सांगितलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!