कठीण काळात मला साथ दिलेल्या प्रत्येकाचे मनापासून आभार

लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून तेजपाल यांची निर्दोष मुक्तता; शुक्रवारी झाली अंतिम सुनावणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः तहलकाचे संस्थापक तरुण तेजपाल यांच्या विरूध्दच्या खटल्याचा अंतिम निवाडा शुक्रवारी पार पडला. तेजपाल यांच्यावरच्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तेजपाल यांची या आरोपातून निर्दोश मुक्तता झाल्यानंतर त्यांनी एक प्रसिद्ध पत्रक जाहीर करून या कठीण काळात त्यांना सोबत केलेल्या प्रत्येकाचे आभार मानलेत.

तरुण तेजपाल म्हणतात,

दीर्घकाळ लढा देऊन क्वचतच एखाद्याला यश मिळतं. मागच्या आठवड्यात माझे वकील राजीव गोम्स यांचा कोविडमुळे मृत्यू झाला. उत्साही आणि हुशार असं हे व्यक्तीमत्त्व, वयाच्या 47 व्या वर्षी राष्ट्रीय पातळीवर क्रीमिनल लॉयर म्हणून त्यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात केली होती.  माझं आयुष्य आणि प्रतिष्ठा मला परत मिळवून देण्यासाठी कोणत्याही व्यक्तीने त्यांच्या एवढा कठोर लढा कौशल्यपूर्णतेने दिला नसता. राजीव नेहमी म्हणायचे, मला पैशाचा आनंद आहे. पण मी त्यासाठी काम करत नाही. माझा विश्वास आहे की देवाने मला निरपराधी लोकांना न्याय मिळून द्यायला पृथ्वीवर पाठवलंय. एक कुटुंब म्हणून राजीव गोम्सवर आमचं मोठं आणि कायमस्वरूपी कर्ज राहणार आहे. राजीवची पत्नी चेरिल आणि मुलगा सेन यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.  कुठलाच क्लायंट राजीवपेक्षा चांगल्या वकिलाची आशा करू शकत नाही. न्यायासाठी लढणारा एक सच्चा प्रतिनिधी आम्ही गमावलाय.

2013 मध्ये माझ्या सहकरी महिलेकडून माझ्याविरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार नोंदवण्यात आली. आज खटला न्यायालयात अतिरिक्त सत्र न्यायाधिश काश्मा जोशी यांनी माझी या आरोपातून निर्दोश मुक्तता केली. या भयंकर विटलेल्या युगात सत्याच्या पाठीशी उभं राहून योग्य तो न्याय केल्याने मी त्यांचे आभार मानतो.

गेली साडेसात वर्षं माझ्या कुटुंबासाठी क्लेशदायक ठरली आहेत. कारण आम्ही आमच्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि सार्वजनिक आयुष्यात प्रत्येक पैलूवर या खोट्या आरोपांमुळे उमटलेले भयावह पडसाद पाहिलेत. पण तरीही आम्ही गोवा पोलिस आणि कायदेशीर प्रणालीबरोबर, शेकडो न्यायालयीन कार्यवाहीद्वारे पूर्णपणे सहकार्य केलं. आम्ही योग्य प्रक्रियेच्या प्रत्येक आदेशाचे पालन केलं आहे.

या न्यायालयाच्या कठोर, निःपक्षपाती आणि न्याय्य खटल्याबद्दल आणि सीसीटीव्ही फुटेज आणि रेकॉर्डवरील इतर अनुभवजन्य सामग्रीची सखोल तपासणी केल्याबद्दल मी गोवा पोलिसांचे मनापासून आभार मानतो. या 8 वर्षांत अनेक उत्कृष्ट वकील आमच्या मदतीला आले, आणि त्या सर्वांमध्ये प्रमोद दुबे, आमिर खान, अंकुर चावला, अमित देसाई, कपिल सिब्बल, सलमान खुर्शीद, अमन लेखी, संदीप कपूर, रायन करंजेवाला आणि श्रीकांत शिवदे यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. माझ्या कुटुंबातील अनेक सदस्य आणि मित्रांचे मी आभार मानतो, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि या कठीण काळात आमच्या पाठीशी उभे राहिले.

मी या वेळी आणखी कोणतेही विधान करू इच्छित नाही. या 8 वर्षांत आमचं अस्ताव्यस्त झालेलं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी माझ्या कुटुंबाला आमची प्रायव्हसी द्यावी अशी मी विनंती करतो. भविष्यात योग्य वेळी मी एक व्यापक विधान करेन.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!