बेतूल समुद्रात मासेमारीसाठी गेलेली होडी उलटली

दोघा मच्छीमारांनी पोहन किनारा गाठून आपले प्राण वाचविले

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः बेतूल समुद्रात मासेमारीसाठी गेलेली लहान मोटर बसविलेली होडी साळ नदीच्या तोंडावर उलटली. या होडीतील दोघा मच्छीमारांनी पोहन किनारा गाठून आपले प्राण वाचवले. चंद्रहास पेडणेकर यांच्या मालकीची या होडीतून मासळी घेऊन मच्छीमार जेटीवर येताना ही दुर्घटना घडली. साळ नदीच्या तोंडावर रेतीचे डोंगर तयार झाल्यामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचे स्थानिक बोट मालकांनी सांगितलं.

एनजीओमुळे ब्रेक वॉटर्स प्रकल्पाची योजना रखडली

सरकारने सुमारे शंभर कोटी रुपये खर्चुन ब्रेक वॉटर्स प्रकल्प उभारण्याची योजना आखली होती, मात्र काही बिगर सरकारी संघटनांनी या प्रकल्पाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे चार वर्षा पासून हा प्रश्न अधांतरी राहिला असल्याचं बोट मालकांनी सांगितले.

ब्रेक वॉटर योजना करण्याची मागणी

रेती साचल्यामुळे अशा दुर्घटना घडण्याचा धोका वाढतोय. बेतूल येथे यापूर्वीही अशा घटना घडलेल्या आहेत, त्यामुळे ब्रेक वॉटर योजना करण्याची मागणी होत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!