गोव्यातून महाराष्ट्राच्या दिशेने दारू वाहतूक करणारा कंटेनर पलटी…

Goan Varta Live | प्रतिनिधी
पेडणे : गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारा ओव्हरलोड कंटेनर तोरसे येथे अवघड वळणावर पलटी झाला. हा अपघात आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर घडला. अपघातानंतर आतील दारू रस्त्यावर विखुरली होती. सुदैवाने चालक व क्लीनर बालंबाल बचावले. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. दरम्यान दोघांनाही गोवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर ही दारू वाहतूक गाडीच्या पासिंग वरून हरियाणा येथे होत असल्याचे समजते.
हेही वाचाःGujarat Assembly Election 2022: गुजरातमध्ये सातव्यांदा कमळ फुललं…

अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटून अपघात
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित कंटेनर मधून गोवा बनावटीची दारू वाहतूक होत होती. तो ओव्हरलोड झाल्यामुळे तोरसे येथे अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटून कंटेनर रस्त्याच्या मधोमध डिव्हायडरवर पलटी झाला. अपघातानंतर आतील दारूच्या काही बॉटल्स रस्त्यावर विखुरल्या गेल्या होत्या. अपघाताची तीव्रता लक्षात घेता आतील चालक व क्लिनर बालंबाल बचावले. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्या दोघांनाही गोवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर गाडीच्या पासिंग वरून ही दारू हरियाणा येथे नेली जात असल्याचे समजते. मात्र याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.
हेही वाचाःHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचलमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय…