आश्वे-मांद्रे येथे पार्टीच्या आयोजकांवर गुन्हा नोंद…

Goan Varta Live | प्रतिनिधी
पेडणे : उच्च न्यायालयाचा आदेश डावलून रात्री उशीरापर्यंत आश्वे-मांद्रे येथील मारबेला बीच रिसॉर्टमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. उच्च न्यायालयाचा आदेश डावलून रात्री उशीरापर्यंत कर्णकर्कश आवाजात पार्टी वाजवणाऱ्या आयोजकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यावेळी वापरण्यात आलेली साऊंड सिस्टीम जप्त करण्यात आली आहे.
हेही वाचाःMopa Airport | मोपा विमानतळाला पर्रीकरांचे नाव!
– उच्च न्यायालयाच्या आदेशाची ऐशी की तैशी
– आश्वे-पेडणे येथील मारबेला बीच रिसॉर्टमध्ये पार्टी
– मध्यरात्री १२ नंतरही कर्णकर्कश आवाजात पार्टी pic.twitter.com/MOg6nvcbJ7— गोवन वार्ता UPDATES (@goanvarta) December 3, 2022
१० नंतरही कर्णकर्कश संगीत लावून पार्ट्या सुरू असल्याचे चित्र
राज्यात रात्री १० नंतर खुल्या जागेत पार्ट्या आयोजित करून ध्वनिप्रदूषण करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने पूर्णपणे बंदी घातली आहे. परंतु, किनारी भागांतील अनेक पार्ट्या आयोजकांनी न्यायालयाच्या या आदेशाला ठेंगा दाखवत रात्री १० नंतरही कर्णकर्कश संगीत लावून पार्ट्या सुरू असल्याचे चित्र किनारी भागांतील अनेक ठिकाणी स्पष्टपणे दिसून येत आहे.
हेही वाचाःRain Update | राज्यात ‘या’ तारखेपासून पावसाचं पुन्हा धुमाशान…
ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश
राज्यात रात्री १० नंतर खुल्या जागेत पार्ट्या आयोजित करून ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश खंडपीठाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, उपविभागीय न्यायदंडाधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना ३० नोव्हेंबर रोजी दिले होते. याप्रकरणी पुढील सुनावणी १४ डिसेंबर रोजी होणार आहे.
हेही वाचाःन्यायालयाच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता; संगीत पार्ट्यांचा धिंगाणा सुरूच!
न्यायालयाच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता
न्यायालयाच्या या आदेशामुळे किनारी भागांत रात्रभर चालणाऱ्या संगीत पार्ट्यांवर आळा बसेल असे तेथील स्थानिकांना वाटले होते. परंतु, न्यायालयाच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता दाखवत आयोजकांनी पार्ट्या सुरूच ठेवलेल्या आहेत. त्यासंदर्भातील तक्रारी स्थानिक पोलिसांकडे करीत आहेत. पण, पोलिसांकडूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचाःमोरजी येथे हॉटेल कर्मचाऱ्याचा समुद्रात बुडून मृत्यू…