म्हापसात कारचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू…

कारमधील सर्वजण बेळगाव कर्नाटकचे असल्याची माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा : कुचेली-म्हापसा येथे भरधाव कारचा भीषण अपघात झाला आहे. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव कारची झाडाला धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये कारचा चुराडा झाला. या धडकेत कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचाःबारावीचा निकाल जाहीर ; मुलींनी मारली बाजी…

https://www.facebook.com/watch/?v=280198567576207

अपघाताचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट

याबाबत अधिक माहिती अशी की, कारमधील सर्वजण बेळगाव कर्नाटकचे असल्याची माहिती असून गोव्यात पर्यटनासाठी आल्याची प्राथमिक माहिती आहे. कर्नाटक नोंदणीकृत कार कुचेली-म्हापसा येथे भरधाव वेगाने आली असता कारची झाडाला धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये कारचा चुराडा झाला. या धडकेत नयर अनगोलकर (२८), रोहन गदद (२६) व सनी अणवेकर (३१) यांचा मृतांमध्ये समावेश तर विशाल कारेकर (२७) हा युवक जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र पहाटेच्या वेळी अपघात झाल्यामुळे चालकाला डुलकी लागल्याने अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 
हेही वाचाःसरकारी कर्मचाऱ्यांसाठी लवकरच ‘ही’ योजना…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!