BAD ROADS | मडगावात रस्त्याला पडले भगदाड

सुदैवाने कोणतीही जिवीतहानी नाही

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगावः संपूर्ण गोव्यातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. त्यांची दुरुस्ती करताना फक्त दिखाव्यापुरतीच केली जाते. राज्यातील रस्त्यांचं बांधकाम किती निकृष्ट दर्जाचं आहे हे  पुन्हा एकदा उदाहरणासह दिसून आलंय. बुधवारी मडगावात भयानक प्रकार घडलाय. अचानक येथील रस्त्याला मोठं भगदाड पडल्याने प्रवासी काहीसे धास्तावलेत.

हेही वाचाः निकृष्ट कामामुळं मुंबई-गोवा महामार्गावर टोल वसूली नको !

बुधवारी घडला प्रकार

निकृष्ट दर्जाचे रस्ते बांधकामाचं उदाहरण बुधवारी मडगावात पाहायला मिळालंय. बुधवारी मडगावातील सर्वात गर्दीचा रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोलवा सर्कल ते केटीसी बसस्टॅंड दरम्यान रस्त्याला मोठं भगदाड पडल्याने वाहतूक काहीवेळासाठी ठप्प झाली. अचानक हा प्रकार घडल्याने सगळेच आश्चर्यचकित झाले.

हेही वाचाः माजी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांची युनिकेम फार्मास्यूटिकल्सला भेट

सुदैवाने जिवीतहानी नाही

दरम्यान या रस्त्याला भगदाड पडलं तेव्हा तिथे कुणी नसल्याने सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र हा प्रकार गंभीर असल्यानं विकासाचं हे भकास रूप पाहून सगळेच धास्तावलेत. अजून किती काळ टॅक्स रुपात जनतेचा पैसा खावून सोयी-सुविधांच्या नावावर, विकासाच्या नावावर जनतेची अशी फसवणूक करणार असल्याच्या प्रतिक्रिया सामान्य स्तरातून येतायत.

हेही वाचाः बांधकामाच्या निकृष्ट गुणवत्तेबद्दल एनएचएआय अधिकाऱ्यांना दंड करणार

अपघात टाळण्यासाठी लावले बॅरिकेड्स

रस्त्याच्या मधोमध हे भगदाड पडल्याने या मार्गाने वाहतूकीसाठी लोकांना समस्या निर्माण होऊ लागली. या भगदाडामुळे पुढे कोणताही मोठा अपघात होऊ नये म्हणून इथे बॅरिकेड्स लावून लोकांना सावधान करण्यात आलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!