सामान्यांना मोठा झटका! पुन्हा महागला घरगुती गॅस सिलेंडर; आता मोजावी लागणार एवढी किंमत

घरगुती सिलेंडर २५ रुपयांनी महागला; गोव्यात ८४८ रुपयांचा सिलेंडर मिळणार ८७३.५० रुपयांना

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः सामान्यांना पुन्हा एकदा मोठा झटका मिळाला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. विना-सबसिडी असणाऱ्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ सोमवारी रात्रीपासून लागू करण्यात आली आहे. शक्यतो महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजीच्या किंमती बदलतात, मात्र आता पुन्हा एकदा एलपीजी गॅसचे दर वाढल्याने सामान्यांना मोठी फटका बसणार आहे.

हेही वाचाः प्रो. एम के जनार्थनम गोवा विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी नियुक्त

किती महाग झाला एलपीजी गॅस सिलेंडर?

घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत यावेळी चक्क २५ रुपयांनी वाढ करण्यात आलीये. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्यांवर महागाईने मोठा वार केला आहे. आतापर्यंत गोव्यात ८४८ रुपयांना मिळणारा सिलेंडर आता २५ रुपयांनी वाढ झाल्याने ८७३.५० रुपयांना मिळणार आहे.

इतर शहरांमधील गॅस सिलिंडरचे दर

या वाढीनंतर मुंबईत दर एलपीजी गॅस सिलेंडरचे 859.5 रुपये आहेत, दिल्लीतही 14.2 किलो एलपीजी गॅस सिलेंडरचे दर एवढेच आहेत. तर कोलकाता आणि लखनऊमध्ये दर अनुक्रमे 886 रुपये आणि 897.5 रुपये आहेत. दरम्यान 19 किलोच्या कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किंमतीतही 68 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे 19 किलोच्या कमर्शिअल गॅस सिलेंडरची किंमत दिल्लीत  1618 रुपये झाली आहे. गेल्या महिन्यातच तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 25.50 रुपयांची वाढ केली होती.

हा व्हि़डिओ पहाः VIDEO | CCP | उदय मडकईकरांनी रोहीत मोन्सेरातांना झापलं

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!