8 कोटी परत गेले, आता 30 कोटींचं काय?

मडगावात पालिका मंडळाची बैठक गाजली

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव: सरकारकडून पालिका क्षेत्रातील विकासकामांसाठी दरवर्षी निधीचा पुरवठा होतो. गेल्यावर्षी आलेले ८ कोटी रुपये पलिका मंडळाने वापरात आणलं नसल्यानं परत गेले. तरी शिल्लक असलेले ३० कोटी रुपये अजून वापरात आणले जात नाहीत. आता ही रक्कमही सरकारला परत जाणार असल्याच्या विषयावरून पालिका मंडळाची बैठक गाजली. सरकारशी शिफारस शिल्लक असलेला निधी पालिकेच्या विकासासाठी वापरण्यात यावा, अशी मागणी बहुसंख्य नगरसेवकांनी केली.

हेही वाचाः म्हापशात माटोळीचा बाजार मार्केटमध्ये भरणार

नगराध्यक्ष लिंडन पेरेरा यांच्या अध्यक्षतेखाली पालिका मंडळाची मासिक बैठक

मडगाव पालिकेचे नगराध्यक्ष लिंडन पेरेरा यांच्या अध्यक्षतेखाली पालिका मंडळाची मासिक बैठक पार पडली. उपनगराध्यक्षा दिपाली सावळ, मुख्याधिकारी आरोल फर्नांडिस यांच्या उपस्थितीत विविध विषयांवर चर्चा झाली. सुरुवातीला मागील बैठकीचे इतिवृत्त मंजूर करून घेण्यासाठी सुमारे दीड तासांची चर्चा झाली. नंतर अजेंडानुसार कामकाजाला सुरुवात करण्यात आली.

पालिका मंडळाने सरकारच्या निधीचा अपेक्षित वापर केला नाही

२००१ पासून पालिकला सरकारकडून विकासासाठी निधी आला होता. पण तत्कालीन पालिका मंडळाने सरकारच्या निधीचा अपेक्षित वापर केला नाही. पालिकेने नियमित वेळेत विकासासाठी आलेल्या निधीचा वापर केला नसल्याने लेखा विभागाला निधी परत पाठवणं भाग पडलं. या मुद्यावरून नगरसेवक घनश्याम शिरोडकर, महेश आमोणकर व सगुण नायक यांनी बैठकीत संताप व्यक्त केला. पालिका क्षेत्रातील विकासकामे करण्यासाठी पालिकेतर्फे आधी करण्यात आलेल्या विकासकामांचा सविस्तर तपशील सरकारला सादर करावा याबाबतचं परिपत्रक पालिका प्रशासकांनी सर्व पालिकांना पाठवलं आहे. जोपर्यंत आधी केलेल्या विकासकामांची माहिती दिली जात नाही, तोपर्यंत नवीन विकासकामांना पालिका प्रशासनाकडून परवानगी दिली जाणार नसल्याचं ठळकपणे परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे. या विषयावरूनही पालिकेची बैठक रंगली. पालिकेने या विषयावर खास बैठक शोलातून चर्चा करावी. नंतर चर्चेतील सूर ओळखून विकासकामांबद्दल पालिका प्रशासकांशी पत्रव्यवहार करावा.

हेही वाचाः हळदोणात चित्रपट चित्रीकरणास कोमुनिदादचा विरोध

त्याचा फटका इतर पालिकांना का?

कुठल्या तरी एका पालिकेने दुप्पट कामांच्या निविदा काढून सरकारचा निधी परस्पर हडप केला असावा. त्याचा फटका इतर पालिकांना का? असा सवाल उपस्थित झाला. या दुप्पट कामाच्या अनुषंगाने मागे लोकायुक्तांनी आदेश दिला होता. त्यानुसार विकासकामांबद्दल आधी सविस्तर तपशिल मागितलेला आहे. तीन कचरावाहू काँपेक्टर्सच्या खरेददीवरून HPEUT बैठकीत गदारोळ माजला होता. त्या काँपेक्टर्सच्या खरेदीवरुन पालिकेचे ३५ कोटी अडकलेले आहेत. ते पैसे परत कसे आणावे? असा प्रश्न पालिकेसमोर उपस्थित झाल्याने न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय नगराध्यक्षांनी घेतला होता. पण न्यायालयात धाव घेण्यास बहुसंख्य नगरसेवकांनी विरोध केला. यावर चर्चा करण्यासाठी बैठक घेणं गरजेचं असल्याचं मत नगरसेवक घनश्याम शिरोडकर यांनी व्यक्त केलं. तसंच तीन कॉपेक्टर्सच्या खरेदीचे पैसे परत मिळविण्यासाठी प्रयत करावे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

हेही वाचाः चिखली येथे रेती उत्खनन; गुन्हा दाखल

त्या दुचाकी हटवा

पालिका इमारतीच्या खाली सभोवताली रैट – बाईकच्या सुमारे पन्नासहून अधिक दुचाक्या उभ्या करून ठेवल्या जातात. यामुळे पालिकेचे कर्मचारी व पालिकेत कामासाठी येणाऱ्या लोकांना पाकिंगची जागा मिळत नाही. त्यामुळे पालिकेच्या आवारात उभ्या करून ठेवलेल्या रेट – बाईकच्या दुचाक्या त्वरित हटविण्यात याव्यात अशी मागणी नगरसेवक महेश आमोणकर यांनी केली.

हे निर्णय झाले मंजूर

मडगाव शहर आणि फातोर्डा परिसरात सरकारी कार्यालये आणि इतर ठिकाणी अपंग तसंच वृद्धांना पार्किंगसाठी जागा राखून ठेवण्यासाठी सर्वांनी संमती दिली. शहराच्या मध्यवर्ती रोझी बागोझा निवास, आंतोनेत सिकेरा निवास, अमीर कोस्ता निवास आणि फातोर्डातील नेहरू स्टेडियमजवळ चार वीजेचे स्तंभ उभारणं, मलनिसारण व नाईट सोईल टँकर, पशुसेवा, गवळीवाडा येथील मार्गाला जनार्दन हिरणवाले यांचं नाव देणं, ट्रॅफिक सिग्नल्स, पालिकेत लावण्यात आलेल्या अतिमहनीय व्यक्तिची नावं आणि त्यांच्या कार्याबद्दलची माहिती देणं, शिवाजी महाराजांचं मोठं छायाचित्र लावणं या सर्व मुद्यांना पालिका मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. तसंच पीडीएच्या मार्केटमधील बेलिंग मशिनची शेड उभारण्यासाठी एफ अँड एफ कन्स्ट्रक्शनला देण्यात आलेला आदेश रद्द ठरविण्याचा निर्णय पालिका मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

हा व्हिडिओ पहाः MGP OFFICE IN MORJIM | मांद्रे मतदारसंघात मोरजी इथं मगो कार्यालयाचं उद्घाटन

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!