65 मच्छिमारांना मिळाली नुकसान भरपाई

गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटीकडून 20 हजार रुपयांची आर्थिक मदत

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या तात्पुरत्या साठवणुकीच्या नुकसानीसाठी 65 मच्छिमारांना गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटीने (जीसीझेडएमए) 20 हजार रुपयांची मदत दिली आहे. 16 मे रोजी राज्यावर येऊन धडकलेल्या तौक्ते चक्रीवादळाने असंख्य गोंयकारांचं लाखो रुपयांचं नुकसान केलं. त्याच वादळाचा फटका बसलेल्या मच्छिमारांना ‘जीसीझेडएमए’ने आर्थिक मदत करून थोड्याप्रमाणात दिलासा दिलाय.

हेही वाचाः 57 लाख 75 हजाराचे सोने ‘दाबोळी’वरून जप्त

61 मच्छिमारांनी गमावली गिल जाळी

16 मे रोजी तौक्ते चक्रीवादळामुळे झालेले वादळी वारे आणि पावसामुळे अनेक मच्छिमारांच्या होड्या, गिल जाळी आणि तात्पुरत्या साठवणूक करण्यासाठी बांधलेल्या झोपड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. काणकोण, मुरगाव, बार्देश आणि पेडणे तालुक्यातील तब्बल 61 मच्छिमारांनी त्यांची गिल जाळी या वादळात गमावली. तसंच त्यांच्या तात्पुरत्या साठवणूक करण्यासाठी बांधलेल्या झोपड्यांचं नुकसान झाल्याची नोंद झाली आहे, असं पर्यावरण मंत्री नीलेश कॅब्राल म्हणाले.

हेही वाचाः राज्यात शोकाकुल वातावरण; भाजप टीका उत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटनात व्यस्त

वादळात होड्या एकमेकांवर आदळल्या

वाऱ्याच्या वेगामुळे मच्छिमारांच्या होड्या एकमेकांवर आदळल्या आणि त्यांचं नुकसान झालं. मासेमारीच्या जाळ्यांच्या मोटर्सचं किरकोळ नुकसान झालं, तर मच्छिमारांच्या झोपड्या वाहून गेल्या. या सगळ्यामुळे मच्छिमारांना आर्थिक फटका सोसावा लागला, असं काब्राल म्हणाले.

हेही वाचाः सांतीनेझ गोळीबारप्रकरणी पुण्याहून आणखीन दोघांना अटक

मत्स्यव्यवसाय विभागाकडे अर्ज करा

तौक्ते चक्रीवादळामुळे ज्या मच्छिमारांच्या होड्यांचं नुकसान झालंय ते कॉर्पस फंडाअंतर्गत मदत मिळवण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडे अर्ज सादर करू शकतात, असं कॅब्राल म्हणालेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!