प्रल्हाद सिंग पटेल मुक्तिदिन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे
थाटात साजरा होणार 60वा गोवा मुक्तिदिन

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी
पणजी : केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक खात्याचे मंत्री प्रल्हाद सिंग पटेल मुक्तिदिन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
हल्लीच दिल्ली दौर्यावर असताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पटेल यांची भेट घेउन गोव्यातील पर्यटन प्रकल्प आणि सांस्कृतिक उपक्रमांविषयी सविस्तर चर्चा केली होती. बोंडला आणि जुने गोवे येथे केंद्र सरकारच्या अर्थसाहाय्यातून दोन पर्यटन प्रकल्प उभे राहणार आहेत. गोव्याच्या अंतर्गत भागातील पर्यटनाविषयी आपण पटेल यांच्याशी सविस्तर बातचित केली असून डिचोली-साखळी-बोंडला व ओल्ड गोवा या भागात हे प्रकल्प येणार आहेत.
दिल्ली भेटीवेळी मुख्यमंत्री सावंत यांनी पटेल यांना गोव्याच्या 60व्या मुक्तिदिनासाठी प्रमुख अतिथी या नात्याने उपस्थित राहण्याची विनंती केली. ती त्यांनी मान्य केली.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.