पाणी दरवाढीनंतर मिळणार महिन्याला ६० लाखांचा महसूल

सरासरी ३८ टक्के ग्राहकांचे शून्य बिल

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : पाणी बिलात ५ टक्के दरवाढ केल्याने सरकारच्या तिजोरीत महिन्याला ६० लाखांची भर पडणे अपेक्षित आहे. प्रतिवर्षाला ही रक्कम ७ कोटी २० लाख रुपये होते. सध्या सरासरी ३८ टक्के ग्राहकांना शून्य बिल येते. त्यामुळे सरासरी ६२ टक्के ग्राहकांनाच पाणी दरवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे.

१ ऑक्टोबरपासून पाणी बिलात ५ टक्के दरवाढ

सरकारने १ ऑक्टोबरपासून पाणी बिलात ५ टक्के दरवाढ केली आहे. ही दरवाढ किरकोळ असल्याचे सरकार म्हणत असले तरी विरोधकांकडून टीका होत आहे. विरोधकांच्या आरोपात तथ्य नसल्याचे सांगत सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी दरवाढीचे समर्थन केले आहे.     

राज्यात ३ लाख १३ हजार घरगुती पाण्याच्या जोडण्या

राज्यात ३ लाख १३ हजार घरगुती पाण्याच्या जोडण्या आहेत. याशिवाय व्यावसायिक, औद्योगिक, शेतीसाठीच्या वेगळ्या जोडण्या आहेत. दर महिन्याला पाणी बिलांतून १२ कोटी रुपयांचा महसूल मिळत आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते संतोष म्हापने यांनी दिली. दरवाढीनंतर महिन्याला १२ कोटी ६० लाखांची रक्कम बिलापोटी सरकारच्या तिजोरीत जमा होणे अपेक्षित आहे.सध्या १६ हजार लिटरपर्यंत पाणी मोफत दिले जाते. १ लाख २० हजार ग्राहकांना शून्य बिल येत आहे. हे प्रमाण साधारण ३८ टक्के होते. याचा अर्थ ६२ टक्के ग्राहकांनाच ५ टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे. दरवाढ झाली असली तरी १६ हजार लिटरपर्यंत पाणी मोफत देण्याची योजना सुरूच राहणार आहे.

हेही वाचाःDrugs : वास्कोत ३० हजार रुपयांचा १५० ग्रॅम गांजा केला जप्त

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!