कोकण रेल्वे मार्गावरील 6 गाड्या रद्द

चक्रीवादळाच्या धोक्यामुळं कोकण रेल्वेचा निर्णय

Goan Varta Live | प्रतिनिधी

सिंधुदुर्ग : चक्रीवादळाच्या धोक्यामुळे दोन दिवसातील कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या सहा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दि. १६ व १७ रोजीच्या तिरुनेलेवली -जामनगर स्पेशल (०९५७७), वास्को द गामा-कुलेम पॅसेंजर (०७३४३), वास्को द गामाकुलेम पॅसेंजर (०७३४२), वास्को द गामा – यशवंतपूर वास्को द गामा-कुलेम पॅसेंजर (०७३४३), कुलेम – वास्को द गामा, वास्को द गामा-कुलेम पॅसेंजर (०७३४४), यशवंतपूर ग वास्को द गामा, वास्को द गामा-कुलेम पसेंजर (०७३३९) या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वे मार्गे धावणारी दि. १७ रोजीची ओखा – एर्नाकुलम स्पेशल गाडी (०७३४२) गुजरातमधील ओखा तसेच अहमदाबाद स्थानकादरम्यान रद्द करण्यात आलेली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!