सहा दिवसांच्या लॉकडाऊनचा कासांवली ग्रामपंचायतीचा निर्णय

सरपंच जोस मारिया फुर्तादो यांची माहिती

श्याम सूर्या नाईक | प्रतिनिधी

पणजी: कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं 6 ते 12 मे या कालावधीत सहा दिवसांचं लॉकडाऊन करण्याचा निर्णय कासांवली ग्रामपंचायतीनं घेतल्याची माहिती सरपंच जोस मारिया फुर्तादो यांनी दिलीय. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गेल्या काही दिवसात अनेक गावांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतलाय. त्यात आता कासांवली गावाचाही समावेश झालाय. यासंदर्भात अधिक माहिती देताना सरपंच फुर्तादो यांनी सांगितलं की, कुठ्ठाळी परिसरात कोरोना वेगानं पसरत आहे. काही दिवसातच तब्बल 131 केसेस आढळून आल्या. त्यामुळं कोरोनाची साखळी तोडण्याची गरज होती.

लॉकडाऊन करावे की नको, यासंदर्भात अनेकांशी चर्चा झाली. त्यानंतर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला गेला. 6 ते 12 मे असा हा सहा दिवसांचा लॉकडाऊन असेल. यात दररोज सकाळी 6 ते 11.30 वाजेपर्यंत आवश्यक वस्तुंची दुकानं सुरू राहतील. दुकानांत कोणीही गर्दी करू नये. कोविडच्या प्रसाराची साखळी तोडण्यासाठी पंचायतीला सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावं, असं आवाहन उपसरपंच रत्नदीप नाईक यांनी केलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!