57 लाख 75 हजाराचे सोने ‘दाबोळी’वरून जप्त

शुक्रवारी पहाटेची घटना; गोवा कस्टम्सची कारवाई; 10 तोळ्याची 11 बिस्किटं जप्त

Goan Varta Live | प्रतिनिधी

वास्कोः शारजाहून एअर अरबिया विमानाने शुक्रवारी पहाटे दाबोळी विमानतळावर उतरलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशाकडून विमानतळावरील गोवा कस्टम्स्ने सुमारे 56 लाख 75 हजार रुपये किंमतीचे तस्करी सोने हस्तगत केले. भारतीय पासपोर्ट असलेल्या सदर प्रवाशाचे नाव नावास असून ते कासारगोड केरळचा निवासी आहे. गोवा कस्टम्सचे सहाय्यक आयुक्त वाय. बी. सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.

हेही वाचाः राज्यात शोकाकुल वातावरण; भाजप टीका उत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटनात व्यस्त

10 तोळ्याची 11 बिस्किटं जप्त

शारजाहून शुक्रवारी पहाटे विमानाने दाबोळी विमानतळावर आलेल्या या प्रवाशाने चेक इन बँगेजमध्ये सदर सोन्याची बिस्कीटे लपवून ठेवली होती. त्याच्या सामानाची तपासणी करण्यात आल्यावर ती कस्टम्सच्या नजरेस आली. त्याने प्रत्येकी दहा तोळ्याची अकरा बिस्कीटे आपल्या सामानामध्ये लपवून ठेवली होती. त्या सर्व बिस्कीटांचं वजन सुमारे 1 किलो 276 ग्रॅम होतं. सदर सोनं कस्टम्स कायदा 1962 तरतुदीखाली जप्त करण्यात आलं आहे. याप्रकरणी पुढील तपास चालू आहे.

या वर्षात आतापर्यंत 2 कोटी 89 लाख रुपयांचं सोनं जप्त

दाबोळी विमानतळावर तैनात असलेल्या गोवा विभागाच्या कस्टम्स अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यंदाच्या कॅलेडर वर्षाच्या आतापर्यंतच्या कारवाईत सुमारे 2 कोटी 89 लाख रुपयांचं सोनं जप्त करण्याची कामगिरी केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!