53rd IFFI First Day : 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला गोव्यात सुरुवात…

जगभरातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि सिनेसृष्टीतील दिग्गजांची हजेरी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत ५३व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. रविवारी संध्याकाळी डॉ. श्यामाप्रसाद इनडोअर स्टेडियम मध्ये इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. स्टेडियम बाहेरील रेड कार्पेटवर बॉलीवूडसह जगभरातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि सिनेसृष्टीतील दिग्गजांनी हजेरी लावली.
हेही वाचाःगोव्यात ३ वर्षांत भव्य मल्टिप्लेक्स सेंटर…

बॉलीवूडमधील अनेक कलाकार जसे की परेश रावल, मनोज वाजपेयी, अजय देवगण, सुनील शेट्टी, वरुण धवन, सारा अली खान, कार्तिक आर्यन, अमृता खानविलकरसह अनेकांनी रेड कार्पेटवर हजेरी लावली.  त्यानंतर डॉ. श्यामाप्रसाद इनडोअर स्टेडियममध्ये राष्ट्रगीताने उद्घाटन समारंभाला सुरुवात झाली.

‘सत्यजित रे जीवनगौरव’ पुरस्कार कार्लोस सोरा यांना प्रदान
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!